शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
6
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
7
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
8
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
9
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
10
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
11
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
12
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
13
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
14
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
15
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
16
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
17
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
18
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
19
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
20
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

पोलिसाकडूनच पोलीस कर्मचा-यास बेदम मारहाण

By admin | Updated: October 19, 2015 01:42 IST

अकोला मध्यवर्ती बसस्थानकासमोरील घटना.

अकोला: मध्यवर्ती बसस्थानकासमोरील पॉइंटवर कार्यरत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यास वाशिम पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी वाशिममधील पोलीस व त्याच्या साथीदाराविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले संजय बळीराम इंगळे हे रविवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानकासमोरील फिक्स पॉइंटवर कार्यरत होते. यावेळी सिग्नल बंद असताना वाशिम पोलीस दलात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी शेखर श्रीधर तायडे व त्याचा साथीदार उमेश अंबादास तेलगोटे हे दोघे त्यांची दुचाकी सिग्नलवर न थांबवता सिग्नल तोडून निघाले; मात्र वाहतूक पोलीस संजय इंगळे यांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना या संदर्भात विचारणा केली असता या दोघांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर इंगळे यांना बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत संजय इंगळे जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी शेखर तायडे व उमेश तेलगोटे या दोघांविरुद्ध कलम ३५३, ३३२, ३४, ११९, १७७ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दोन्ही आरोपींना रविवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.