शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांचा जीव टांगणीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 10:28 IST

पाच सप्टेंबरपर्यंत बदल्यांसाठी मुतदवाढ दिल्याने राज्यातील १ हजार ४०० पेक्षा अधिक पोलीस अधिकाºयांचा जीव टांगणीला लागला आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाच्या संकटामुळे एप्रिल मे महिन्यात होणाºया व कार्यकाळ संपलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबविण्यात आलेल्या असतानाच आता १५ टक्केपोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र या बदल्यांनाही तीन वेळा मुदतवाढ दिल्याने पोलीस अधिकारी आता वर्षाच्या शेवटी होणाºया बदल्यांसाठी अनुत्सुक असल्याची माहिती आहे. पाच सप्टेंबरपर्यंत बदल्यांसाठी मुतदवाढ दिल्याने राज्यातील १ हजार ४०० पेक्षा अधिक पोलीस अधिकाºयांचा जीव टांगणीला लागला आहे.राज्यातील १ हजारांपेक्षा अधिक पोलीस अधिकाºयांचा जिल्ह्यात तसेच परिक्षेत्रात कार्यकाळ संपल्याने त्यांच्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये बदल्या करण्यात येणार होत्या; मात्र लॉकडाऊनमुळे सुरुवातीला पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांना एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली. त्यानंतर १५ टक्के अधिकाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली; मात्र बदल्यांची प्रक्रिया करण्याला तीन वेळा मुदतवाढ दिल्याने पोलीस अधिकाºयांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. तर आता नवीन वार्षिक बदल्यांना तीन ते चार महिन्यांचा कालावधी बाकी असल्याने या बदल्या करण्यातच येऊ नये, अशी मागणीही पोलीस अधिकाºयांकडून करण्यात येत आहे.राज्यस्तरावर बदल्यांची ही प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक तसेच पोलीस आयुक्त यांना त्यांच्या स्तरावरील पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्यात येतात.त्यामुळे या सर्व प्रक्रियेला एक ते दीड महिन्यांचा कालावधी जाणार असल्याने या बदल्याची प्रक्रिया आता मार्च-एप्रिल २०२१ मध्येच करण्यात याव्यात, अशी मागणीही राज्यातील पोलीस अधिकाºयांकडून जोर धरत आहे.

१५ टक्के अधिकारी बदल्यांसाठी पात्रकोरोनाच्या संकटामुळे १५ टक्केच पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. यासाठी पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांचा समावेश आहे. या अधिकाºयांच्या बदल्या केल्यास त्यांना नवीन ठिकाणावर रुजू होणे आणि पदभार स्वीकारल्यानंतर पुन्हा त्या जिल्ह्यात होणाºया बदली प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकटात त्यांच्या कुटुंबीयांचे व चिमुकल्यांचा विचार करता या बदल्या तीन ते चार महिन्यांसाठी थांबविण्याचीच मागणी होत आहे.

या अधिकाºयांचा बदल्यांना आक्षेप नाहीपोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस अधीक्षक या दर्जाच्या पोलीस अधिकाºयांच्या बदल्या केल्या तर त्यांना एवढ्या अडचणी येणार नाहीत. त्यामुळे या वरिष्ठ अधिकाºयांच्या बदल्यांना आक्षेप नसल्याची माहिती आहे.

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस