अकोला : शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर रोखण्यासाठी ‘नो मास्क, नो डील’ हा उपक्रम पोलिसांनी सुरू केला असून, त्यातंर्गतच आता ‘नो मास्क, नो सवारी’ ही मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. यासाठी आॅटोचालकांना सूचना देण्यात आल्या असून, त्यांना नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियम मोडणाºया आॅटोवर कारवाई करण्यात येणार आहे.शहरात धावणाºया जवळपास २ हजार आॅटोवर ‘नो मास्क, नो सवारी’चे पोस्टर्स लावण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी पहिले दोन दिवस आॅटोचालकांची शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांना ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अंतर्गत सर्व आॅटोचालकांनी स्वत: मास्क घालावे व आॅटोमध्ये प्रवास करणाºया सवारीलासुद्धा मास्क घालणे बंधनकारक करावे, अशा सूचना केल्या आहेत. सवारी मास्क घालण्यासाठी तयार नसल्यास अशी सवारी आॅटोमध्ये बसवून घेऊ नये, या माध्यमातून स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याला आॅटोचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शहरात दररोज जवळपास २ हजार आॅटो धावत असल्याने यामधून हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. या मोहिमेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना प्रबोधन करणे शक्य असल्याने ही मोहीम शहर वाहतूक शाखेकडून शहरात राबविण्यात येणार आहे. दिलेल्या सूचनेचे पालन न करणाºया आॅटोचालकांनी दंडात्मक कारवाईस तयार राहावे, असा इशारासुद्धा वाहतूक शाखेने दिला आहे. शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके यांच्या उपस्थितीमध्ये आॅटोवर ‘नो मास्क, नो सवारी’ असा उल्लेख असलेले पोस्टर्स लावण्यात येत आहे. एक हजारावर आॅटोवर पोस्टर्सयेणाºया दोन दिवसात शहरातील जवळपास १ हजार २०० आॅटोवर शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी पोस्टर्स लावणार असून, सूचना न पाळणाºया आॅटोवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी आॅटाचालकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अकोला पोलिसांची ‘नो मास्क, नो सवारी’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 19:55 IST