शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सायरे निलंबित

By आशीष गावंडे | Updated: May 22, 2024 21:10 IST

नागपूर येथील युवतीच्या विनयभंग प्रकरणी जामीन फेटाळला

अकाेला: स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिची छेड काढण्याचा आराेप असलेले खदान पाेलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे (५३)रा.अकाेला यांच्या विराेधात नंदनवन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सायरे यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. तसेच याप्रकरणी विभागीय चाैकशीचे आदेशही देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, सायरे यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.  

निलंबित पाेलिस निरीक्षक धनंजय सायरे हे मुळ अमरावतीचे रहिवासी आहेत. पीडित तरुणीही अमरावतीची असून, तिचे वडील सायरे यांना ओळखतात. गेल्या काही महिन्यांपासून ही तरुणी नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून, ती नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. याबाबत सायरे यांना कळाले असता, त्यांनी तरुणीशी संपर्क साधून स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक ती मदत करण्याची हमी दिली. त्यानंतर ते नियमितपणे मोबाइलद्वारे तरुणीशी संपर्क साधायला लागले. मी अनेकांचे करिअर घडविले आहे. तुझेही करिअर घडवेल. मी तुला नेहमीच मार्गदर्शन करेल,असे ते म्हणाले. सायरे सतत संपर्क साधत असल्याने तरुणीला संशय आला. याबाबत तिने आई-वडिलांना सांगितले. पालकांनी तिला दुर्लक्ष करण्याचा सल्ला देत अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले. १८ मे राेजी सायंकाळी सायरे तरुणीच्या घरासमोर आले. घरापासून काही अंतरावर सायरे यांनी तरुणीला अडवत तिचा हात पकडत छेड काढली. याप्रकरणी तरुणीने तातडीने नंदनवन पोलिस स्टेशन गाठत सायरे यांच्याविराेधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून सायरे फरार आहेत. 

सायरे यांचे निलंबन; पाेलिस दलात निरव शांतताशहरात एकूण आठ पाेलिस ठाणे आहेत. त्यापैकी खदान पाेलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सायरे यांची दबंग व कर्तव्याला प्राधान्य देणारा अधिकारी अशी ओळख हाेती. पाेलिस प्रशासनाने सायरे यांच्या निलंबनाचा आदेश जारी केल्यानंतर पाेलिस दलात निरव शांतता पसरल्याचे चित्र आहे. 

अटकपूर्व जामीन फेटाळलानिलंबित पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांनी नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने नागपूर पोलिसांना ‘से’ मागितला होता, त्यानुसार पोलिसांनी ‘से’ दाखल केला. २२ मे रोजी सायरे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असता, एफआयआरमध्ये नमूद बाबी लक्षात घेता त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

टॅग्स :Akolaअकोला