शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर जिल्हा उपनिबंधकासह विक्रीकर च्या सहायक आयुक्तास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 19:26 IST

टक केल्यानंतर शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपीस १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

अकोला : अकोट बाजार समितीच्या सचिवांसह त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यासाठी तसेच थकबाकी रकमेच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी जिल्हा उप-निबंधक डॉ. प्रवीण लोखंडे याने त्याचा लाचखोर साथीदार तसेच विक्रीकर विभागाचा सहायक आयुक्त अमरप्रीत सिंग सेठी याच्यामार्फत गुरुवारी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारली. या दोघांनाही अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपीस १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.सहकार विभागाचा जिल्हा उप-निबंधक डॉ. प्रवीण लोखंडे व विक्रीकर विभागाचा सहायक आयुक्त अमरप्रीत सिंग सेठी या दोघांनी अकोट बाजार समितीच्या सचिवांसह त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यासोबतच थकबाकी रकमेच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी जिल्हा उप-निबंधक डॉ. प्रवीण लोखंडे याने विक्रीकर विभागाचा सहायक आयुक्त अमर सेठी याच्यामार्फत पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १० जून रोजी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता, त्यामध्ये हे दोघे अडकले. अमर सेठी याच्या महाजनी प्लॉट येथील घरात लाच घेताना अटक करण्यात आली होती. तत्पूर्वी जिल्हा उप-निबंधक प्रवीण लोखंडे आणि अमर सेठी या दोघांनी तक्रारकर्त्याकडून घेतलेली दोन लाख रुपयांच्या लाचेची रक्कम परत केली; मात्र पंचासमक्ष केलेल्या दोन वेळच्या पडताळणीत ५ लाखांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते, तसेच लाचेची रक्कमही स्वीकारली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोन्ही लाचखोरांना तातडीने अटक केली. त्यानंतर या दोघांवरही रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 

टॅग्स :AkolaअकोलाBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी