शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Police Commemoration Day : पोलीस स्मृतीदिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 15:07 IST

अकोला - पोलीस स्मृतिदिनानिमित्त गत वर्षभरात कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेल्या देशातील ४१६ पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना रविवारी सकाळी पोलीस मुख्यालयामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.

अकोला - पोलीस स्मृतिदिनानिमित्त गत वर्षभरात कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेल्या देशातील ४१६ पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना रविवारी सकाळी पोलीस मुख्यालयामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील पोलीस हवालदार सुनिल दत्तात्रय कदम, सुरेश दत्तात्रय गावडे आणि पोलीस काँस्टेबल सतीश श्रद्धाराव मडवी यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण केली.१ सप्टेंबर २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत देशातील सर्व राज्यात पोलीस दलाचे पोलीस अधिकारी व जवान असे ४१६ जणांनी कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. अशा सर्वांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कवायतीचे नेतृत्व विकास तीडके व पोलीस अधीकाºयांनी केले. जवानांच्या नावाच्या यादीचे वाचन शोक कवायतीच्यादरम्यान करण्यात आले. यावेळी पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख कैलास नागरे, वाहतुक शाखा प्रमूख तथा सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील, खदानचे ठाणेदार संतोष महल्ले, रामदास पेठचे ठाणेदार शैलेष सपकाळ, जुने शहरचे अन्वर शेख, सिव्हील लाईन्सचे एस. मोरे, एमआयडीसीचे कीशोर शेळके, अकोट फैलचे राजु भारसाकळे उपस्थित होते.या कारणामूळे पाळला जातो हुतात्मा दिनलडाख भागातील सरहद्दीवर १८ हजार फुट उंचीवर हॉट स्प्रिंग्ज नावाचे ठिकाण आहे. २१ आॅक्टोंबर १९५९ रोजी या ठिकाणी गस्त चालू असताना पर्वताच्या डाव्या बाजूला तुकडीला काही संशयास्पद खुणा दिसल्या. तुकडी त्या दिशेने चालू लागली. तेव्हा त्यांच्यावर अचानक भयानक गोळीबार सुरु झाला. त्यात १० जवानांना वीर मरण आले. ९ जण जखमी झाले. त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवरही चिनी सैनिकांनी अचानक हल्ला केला होता. १३ नोव्हेंबरला चिनी सैनिकांनी या जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हॉट स्प्रिंग्ज येथे त्याच्यावर सन्मानपूर्वक अंत्यविधी करण्यात आले. त्यावेळी प्रत्येक राज्यातील पोलीस दलांनी त्या त्या ठिकाणी या वीरांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर पाटणा येथे त्या वर्षी झालेल्या अखिल भारतीय पोलीस स्पर्धाच्या वेळी सर्वांनी आमच्या या वीर हुतात्म्यांचे स्मरण आम्ही दरवर्षी २१ आॅक्टोंबरला पोलीस हुतात्मा दिन पाळून करु अशी शपथ घेतली. तेव्हापासून दरवर्षी संपूर्ण देशभर जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो.

टॅग्स :AkolaअकोलाPolice Commemoration Dayपोलीस हुतात्मा दिन