अकोला- वाशिम जिल्हय़ातील पांगराबंदी येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून तिच्यावर शारीरिक अत्याचार करणार्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी.भालचंद्र यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पांगराबंदी येथील रहिवासी जगदीश ऊर्फ चिव्या घुगे याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून तिच्यावर बाश्रीटाकळी तालुक्यातील अजनी (बु.) ते मरडोह दरम्यान दुचाकीवर व त्यानंतर त्याचा साथीदार असलेला हरिश्चंद्र रामदास पाखरे याच्या घरी नेऊन शारीरिक अत्याचार केला होता. सदर मुलीने या नराधमाच्या तावडीतून सुटका करून घेत थेट बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यात जगदीश ऊर्फ चिव्या घुगे व हरिश्चंद्र रामदास पाखरे या दोघाच्या कृत्याची कथनी पोलिसांसमोर बयाण केली होती. यावरून बाश्रीटाकळी पोलिसांनी सदर दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३६३, ३६६, ३७६ व पॉस्को अँक्टच्या कलम ४ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपी हरिश्चंद्र पाखरे याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर शनिवारी रात्रीच दुसरा आरोपी चिव्या घुगे यालाही अटक करून जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-यास पोलीस कोठडी
By admin | Updated: June 15, 2015 01:54 IST