शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सतर्कतेने विद्यार्थ्यास दुचाकी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:19 IST

खामगाव येथील विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी अकोला येथील शिवाजी महाविद्यालयात आला असता त्याने त्याची मोटरसायकल क्र. MH ...

खामगाव येथील विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी अकोला येथील शिवाजी महाविद्यालयात आला असता त्याने त्याची मोटरसायकल क्र. MH 28 AH 7877 पार्क करून परीक्षा संपल्यानंतर परत आला असता त्याला मोटरसायकल दिसून आली नाही, कोणीतरी चुकीने घेऊन गेला असेल असे समजून त्याने आजूबाजूला शोध घेतला असता मिळून न आल्यामुळे त्याने पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे लेखी तक्रार दिली असता तक्रार नोंदवून रामदास पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार ह्यांनी शोध सुरू केला. दरम्यान वाशिम बायपास चौकात शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार शेख फराज शेख सरफराज हे कर्तव्य बजावत असताना त्यांना एक मोटरसायकलस्वार येताना दिसला, कागदपत्रे चेक करण्यासाठी त्याची मोटरसायकल त्याने हळू केली व कागदपत्रे जवळ नसल्याने न थांबता तसाच पुढे मोटरसायकल वेगाने पळविली, वाहतूक पोलिसाला संशय आल्याने त्यांनी सदर मोटरसायकलस्वार ह्याचा पाठलाग केला असता त्याने सदर मोटरसायकल सरकारी बगीचाजवळ सोडून पळून गेले, मोटारसायकलचा मूळ मालक सागर पाटील ह्याला माहिती दिली असता तो त्वरेने अकोला येथे येऊन वाहतूक कार्यालयात आला. रामदास पेठ पोलीस स्टेशनला सदर माहिती देऊन मोटरसायकल त्यांच्या ताब्यात देण्यात आली.