शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

निर्विघ्न गणेशाेत्सवासाठी पाेलिसांचा ॲक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 11:09 IST

Police action plan for Ganesha festival : उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी तब्बल दाेन हजार पाेलिसांना १० दिवस रस्त्यावरच कडेकाेट बंदाेबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे़

- सचिन राऊत

अकाेला : गणेशाेत्सवासाठी अकाेला पाेलिसांनी ॲक्शन प्लॅन केला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे़. यानुसार अकाेला पाेलिसांनी आतापर्यंत शांतता समितीच्या ४३ बैठका घेण्यात आल्या असून पाेलीस स्टेशन स्तरावरील पाेलीस मित्र यांच्या तब्बल ५५ बैठका घेऊन हा उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी तब्बल दाेन हजार पाेलिसांना १० दिवस रस्त्यावरच कडेकाेट बंदाेबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे़. यासाेबतच गावखेड्यात ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमात ग्रामस्थांनी माेठ्या प्रमाणात सहभागी हाेण्याचे आवाहन पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांनी केले आहे़.

असा राहणार पाेलीस बंदाेबस्त

१० सप्टेंबर राेजी सुरू हाेणाऱ्या गणेशाेत्सवासाठी जिल्हा पोलीस दलातील १ अपर पोलीस अधीक्षक, २ उपविभागीय पोलीस अधिकारी, २० पोलीस निरीक्षक, ९५ सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, १४०० पोलीस कर्मचारी, ५०० होमगार्ड्स तसेच पोलीस मुख्यालयातील ४ आरसीपी प्लाटून, १ क्युआरटी प्लाटून, रिझर्व्ह फोर्स, तसेच राज्य राखीव पोलीस बलाची एक कंपनी असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ हा बंदाेबस्त पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात काम करणार आहे़.

८७२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

गणेशोत्सवादरम्यान जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कलम १०७ अन्वये ६४९, कलम १०९ अन्वये ०६, ११० अन्वये ३१ तर कलम ५५, ५६, ५७ अन्वये ०८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे़ कलम १४४ अन्वये १५२ व कलम १४९ अन्वये २६ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गणेशाेत्सवापूर्वी तब्बल ८७२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे़.

६६ टाेळ्या हद्दपार ३७ जनांवर एमपीडीए

अकाेला पोलीस दलाकडून गुन्हेगारी वृत्तीचे एकूण ३७ इसमांविरुद्ध एमपीडीए ॲक्टअन्वये कारवाई करण्यात आली आहे़ या आराेपींना कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे, तर एकूण ६६ गुन्हेगारी टोळ्यांना अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

दंगा काबू, रुट मार्च

पाेलीस स्टेशन स्तरावर या काळात गस्ती पथक तयार करण्यात आलेली आहे़ या पथकांकडून प्रत्येक गणेश मंडळावर वाॅच राहणार आहे, तर शहरातील विविध भागांत दंगा काबू नियंत्रणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले आहे़ यासाेबतच शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पथसंचलन करण्यात आले आहे़

टॅग्स :Akola Police Head Quarterअकोला पोलीस मुख्यालयGanpati Festivalगणेशोत्सव