विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:20 AM2021-05-06T04:20:18+5:302021-05-06T04:20:18+5:30

बोरगाव मंजू परिसरात वीजपुरवठा खंडित बोरगाव मंजू : परिसरातील आजूबाजूच्या गावांमध्ये वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने, शेतकऱ्यांसमोर पिकांच्या सिंचनाचा ...

Police action against unruly wanderers | विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Next

बोरगाव मंजू परिसरात वीजपुरवठा खंडित

बोरगाव मंजू : परिसरातील आजूबाजूच्या गावांमध्ये वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने, शेतकऱ्यांसमोर पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

दानापूर येथील पथदिवे दोन महिन्यांपासून बंद

दानापूर : दानापूर प्रा.आ.केंद्राच्या परिसरात असलेले हायमास्ट पथदिवे गत दोन महिन्यांपासून बंद आहेत. आरोग्य केंद्रांतर्गत ३३ गावे येतात. या ठिकाणी आदिवासी रुग्ण येतात. पथदिवे बंद असल्याने अंधाराचा सामना करावा लागत आहे. येथील पथदिवे सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लाभार्थ्यांना अद्यापही शासनाकडून मदत नाही!

हाता : बाळापूर तहसील अंतर्गत ग्रामीण भागांमधील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. संचारबंदीमुळे मजुरांना काम नाही. भूमिहीन मजुरांना शासनाकडून मदत जाहीर झाली. परंतु अद्यापपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. मजुरांची परिस्थिती फार बिकट झाली. शासनाने जाहीर केलेले पॅकेज व मदत तत्काळ द्यावी.

एसटी बसवर प्रवाशांची गर्दी!

निंबा फाटा : कोरोनाची साखळी तोडण्याकरिता शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळविण्याकरिता अत्यावश्यक सेवांवर वेळेची बंधने घातली. मात्र वाहतूक सुरू असल्यामुळे एसटी बसगाड्यांवर नागरिकांची गर्दी होत आहे. गर्दीमुळे कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

दिग्रस बु : पातूर तालुक्यातील सस्ती अंतर्गत वीज उपकेंद्रात अंतर्गत येत असलेला २५ ते ३० गावात वीज पुरवठा दररोज दिवसातून तीन ते चार वेळा आणि तासनतास खंडित होत असल्याने वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे ग्रामीण युवक संघटनेने मंगळवारी महावितरण कार्यालयात निवेदन दिले.

कुटुंब वित्त साहाय्य योजनेतून मदत

बार्शीटाकळी : राष्ट्रीय कुटुंब वित्त साहाय्य योजनेतून तालुक्यातील १५ लाभार्थ्यांना २० हजार रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. या योजनेतून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास, शासनाकडून २० हजार रुपयांची मदत देण्यात येते.

आगर येथे कोरोना जनजागृती मोहीम

आगर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उरळचे ठाणेदार अनंत वडतकार यांनी मंगळवारी आगर गावासह परिसरात फिरून कोरोनाची जनजागृती केली. कोरोना जनजागृती फलकाचे अनावरण केले. यावेळी ज्ञानेश्वर काळणे, रामदास भिसे, सुनील फुकट, सचिन गायकवाड, देवीदास जगदाळे, श्रीकृष्ण फुकट, गणेश फुकट उपस्थित होते.

बोरगाव मंजू येथे नियमांचा फज्जा

बोरगाव मंजू : गावातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही नागरिक बेफिकीर होत वावरताना दिसत आहेत. गावात मंगळवारी आठवडी बाजार होता. बाजारात या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

‘पोलीस आपल्या दारी’ मोहिमेला प्रतिसाद

बार्शीटाकळी : तालुक्यातील दोनद खु. येथे पिंजर पोलिसांच्या वतीने ‘एक गाव, एक पोलीस’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी पीएसआय विकास राठोड, बिट जमादार महादेव सोळंके यांनी उपक्रमाची माहिती दिली. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्षांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

वाडेगावात बँकेत शेतकरी व वृद्धांची गर्दी

वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील स्थानिक वाडेगाव येथील बँक व परिसरात निराधार लोकांची विविध योजनेचे मानधन घेण्यासाठी मोठी गर्दी हाेत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, संचारबंदी लागू करण्यात आली. परंतु नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहेत. कोरोना नियमांचे फज्जा उडत आहेत.

पास्टूल येथे सॅनिटायझरची फवारणी

पातूर : तालुक्यातील पास्टूल येथे ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही फवारणी करण्यात आली. सरपंच आम्रपाली घुगे, सरपंच मंगेश केकन, सदस्य लता घुगे, अश्विनी चतरकर, अलका घुगे यांच्या पुढाकाराने सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.

राकाँ ओबीसी सेलकडून भोजनदान

मूर्तिजापूर : येथील नंदनवन कुष्ठधाम पारधीनगर येथे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी गरजू, गरीब व कुष्ठरोगी यांना बुधवारी मिष्टान्न भोजनाचे वितरण केले. यावेळी महासचिव किशोर सोनोने, तालुकाध्यक्ष विष्णू लोडम, शहराध्यक्ष विशाल शिरभाते, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा कावरे उपस्थित होते.

खंडाळा येथे लसीकरणाला प्रतिसाद

खंडाळा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, आरोग्य विभागामार्फत खंडाळा येथे कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये डाॅ. नंदकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आरोग्यसेविका वर्षा मेश्रामकर, सत्यभामा पाटोळे लसीकरण मोहीम राबवित आहेत.

मन व पूर्णा नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन

निंबा फाटा : परिसरातील मन व पूर्णा नदीतील एकाही वाळू घाटाचा लिलाव झालेला नसताना, राॅयल्टी नसताना रेती, माती व मुरमाची अवैध वाहतूक सर्रास सुरू आहे. वाळूचोरांची नदीपात्रात रात्रंदिवस गर्दी होत आहे. महसूल विभाग मात्र याकडे डोळेझाक करीत आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई

उरळ : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उरळ पोलीस रस्त्यावर उतरले असून, धडक कारवाई सुरू केली आहे. उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील निंबा फाटा चेकपोस्टवर विनामास्क व नाहक गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करीत दंड वसूल करण्यात आला. तसेच काहींना पोलिसांच्या दंडुक्यांचा प्रसादही मिळाला. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार व वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

हातरुण-गांधीग्राम रस्त्याची दयनीय अवस्था

हातरुण : हातरुण-गांधीग्राम रस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी हातरुण परिसरातील ग्रामस्थांसह वाहनचालकांकडून होत आहे.

बाजारपेठेत गर्दी कायम; संसर्गाचा धोका वाढला!

निहिदा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मात्र बार्शीटाकळी तालुक्यात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील बाजारपेठेत गर्दी, बसस्थानकात गर्दी, बाजारपेठेत गर्दी दिसून येत असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे.

Web Title: Police action against unruly wanderers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.