शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

फवारणीतून विषबाधा : केवळ ४६८ शेतकरी-शेतमजुरांची आरोग्य तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 15:28 IST

१३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी करणाºया केवळ ४६८ शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या विशेष आरोग्य तपासणीमध्ये १३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील कीटकनाशक फवारणी करणाऱ्या केवळ ४६८ शेतकरी-शेतमजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यानुषंगाने कीटकनाशक फवारणी करणाºया जिल्ह्यातील सर्व शेतकरी-शेतमजुरांची आरोग्य तपासणी केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्ह्यात पिकांवरील कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकरी-शेतमजुरांकडून कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे; परंतु जिल्ह्यात गत दोन महिन्यांच्या कालावधीत कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने, १० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १३८ शेतकरी-शेतमजुरांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. कीटनाशकांच्या फवारणीतून विषबाधेच्या घटना वाढल्याने, कृषी विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात कीटकनाशकाची फवारणी करणाºया शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी करण्याची विशेष मोहीम गत २६ आॅगस्टपासून सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २५ आयुर्वेदिक दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कीटकनाशक फवारणी करणाºया शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य तपासणी सुरू होऊन १८ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र १३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी करणाºया केवळ ४६८ शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी होणे अद्याप प्रलंबित असल्याने, जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी करणाºया सर्व शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी केव्हा पूर्ण करण्यात येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अशी केली जाते आरोग्य तपासणी!कीटकनाशकाची फवारणी करणाºया शेतकरी व शेतमजुरांच्या आरोग्य तपासणीत शेतकरी व शेतमजुरांना आजार आहे का, तसेच फवारणी करण्यापूर्वी व फवारणी केल्यानंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात वैद्यकीय अधिकाºयांकडून शेतकरी-शेतमजुरांना सल्ला देण्यात येतो.जिल्ह्यात कीटकनाशकाची फवारणी करणाºया शेतकरी व शेतमजुरांच्या आरोग्य तपासणीची मोहीम सुरू आहे. त्यामध्ये संपूर्ण आरोग्य तपासणीसह फवारणी करण्यापूर्वी व फवारणीनंतर घ्यावयाची काळजी, याबाबत शेतकरी व शेतमजुरांना सल्ला देण्यात येत आहे.- डॉ. सुरेश आसोलेजिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

आरोग्य तपासणी केलेले असे आहेत शेतकरी-शेतमजूर!तालुका                      शेतकरीबाळापूर                    १५०बार्शीटाकळी              ५८तेल्हारा                     २५मूर्तिजापूर                ८५पातूर                        २३अकोला                    ६१अकोट                      ६६...................................एकूण                     ४६८

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती