शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
5
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
6
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
7
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
8
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
9
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
10
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
11
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
12
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
13
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
14
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
15
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
16
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
17
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
18
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
20
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?

लोकप्रतिनिधींनी विकले गुंठेवारीचे प्लॉट; नकाशे मंजूर करण्यास मनपाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 13:37 IST

मनपाने गुंठेवारी प्लॉटचे नकाशे मंजूर करण्यास नकार दिल्याने संबंधित मालमत्ताधारक सैरभैर झाल्याचे चित्र मनपात पाहावयास मिळत आहे.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील गुंठेवारी जमिनींच्या नियमबाह्य खरेदी-विक्रीच्या प्रकरणांसह काही मोक्याच्या जागांवरील आरक्षण रद्द करण्याचा घाट रचल्या जात असल्याच्या प्रकरणांची राज्य शासनाने गंभीर दखल घेत गुंठेवारीच्या प्रकरणांची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश महापालिकेला जारी केला. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचा पुळका आणणारे शहरातील दोन लोकप्रतिनिधी व एका उद्योजकाने जुने शहरात कोट्यवधी रुपये किमतीच्या गुंठेवारी प्लॉटची विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यादरम्यान, मनपाने गुंठेवारी प्लॉटचे नकाशे मंजूर करण्यास नकार दिल्याने संबंधित मालमत्ताधारक सैरभैर झाल्याचे चित्र मनपात पाहावयास मिळत आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याच्या आविर्भावात वावरणाऱ्या शहरातील लोकप्रतिनिधी-उद्योजकांनी गुंठेवारी जमिनींच्या नियमबाह्य व्यवहारातून हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाºया अकोलेरांची फसगत गेल्याचे दिसून येत आहे. काही भूखंड माफियांनी शेत जमिनी अकृषक करताना मनपाच्या नियमानुसार ले-आउट करून घेतले नाहीत. स्वत:च्या तुंबड्या भरण्याच्या उद्देशातून गुंठेवारी पद्धतीने प्लॉटची तसेच सदर जागेवर उभारलेल्या टोलेजंग सदनिका (फ्लॅट), डुप्लेक्सची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याची असंख्य प्रकरणे उजेडात आली आहेत. त्याचा त्रास गुंठेवारी प्लॉटची खरेदी केलेल्या सर्वसामान्य अकोलेकरांना होत आहे.असाच एक प्रकार जुने शहरातील बाळापूर रोड भागातील चिंतामणी नगरमध्ये गुंठेवारी जमिनीच्या संदर्भात उघडकीस आला आहे. दोन लोकप्रतिनिधी व बड्या उद्योजकाने संबंधित गुंठेवारी जमिनीची चढ्या दराने विक्री केली आहे. आजरोजी संबंधित मालमत्ताधारकांचे नकाशे मंजूर होत नसल्याने त्यांच्या घराच्या स्वप्नावर पाणी फेरल्या गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

‘त्या’ लोकप्रतिनिधींकडून दबावतंत्राचा वापरभविष्यात मनपा क्षेत्रातील अकृषक जमिनींवर नियमानुसार ले-आउटचे निर्माण केल्यास विकास कामे करताना मनपाला अडचण निर्माण होणार नाही, ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने १ एप्रिल २०१४ पासून गुंठेवारी कायद्याची अंमलबजावणी बंद केली. तरीही गुंठेवारी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनावर ‘त्या’ लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची माहिती आहे.‘ओपन स्पेस’,सर्व्हिस लाइन नाही!शहरात सर्वत्र गुंठेवारी पद्धतीने प्लॉटची विक्री करताना ले-आउटचे सर्व निकष, नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. हीच पद्धत चिंतामणी नगरमधील जमिनीबाबत कायम आहे. या ठिकाणी ओपन स्पेससाठी जमिनीच्या एकूण क्षेत्रफळानुसार १० टक्के जागा राखीव न ठेवता त्याचीही विक्री करण्यात आली. रस्ते, पथदिवे, सर्व्हिस लाइन, जलवाहिनीसाठी जागा आरक्षित न ठेवता गुंठेवारीच्या नावाखाली ‘त्या’ दोन्ही लोकप्रतिनिधींनी व भूखंड माफियांनी सर्वसामान्यांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

राज्य शासनाने गुंठेवारी प्रकरणांच्या चौकशीचा आदेश देण्यापूर्वीच आम्ही गुंठेवारी कायद्याची अंमलबजावणी बंद केली होती. त्यामुळे आम्ही नकाशा मंजूर करू शकत नाही. आमच्यावर दबाव असण्याचा प्रश्नच नाही.- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका