शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड प्रकरणात भूमी अभिलेख विभागाची भूमिका संशयास्पद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:44 IST

अकोला: शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा ४0 हजार स्क्वेअर फूट भूखंड भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी संगनमताने मिळून गजराज मारवाडी याच्या नावे केला. या प्रकरणाचा पर्दाफाश लोकमतने केला. सोबतच सदर प्रकरणाची सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली आहे; मात्र १५ दिवसांचा कालावधी उलटल्यावरही भूमी अभिलेख विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांना हा घोटाळा करणारे अधिकारी व कर्मचारी दिसत नसून, त्यांची तपासणी सुरू असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. यावरून या विभागातील सध्याचे अधिकारी त्यांच्या खात्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना वाचविण्यासाठी आटापिटा करीत असल्याचे वृत्त आहे. 

ठळक मुद्देभूखंड हडपल्याचे प्रकरण१५ दिवसानंतरही ते अधिकारी,कर्मचारी मिळेना!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा ४0 हजार स्क्वेअर फूट भूखंड भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी संगनमताने मिळून गजराज मारवाडी याच्या नावे केला. या प्रकरणाचा पर्दाफाश लोकमतने केला. सोबतच सदर प्रकरणाची सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली आहे; मात्र १५ दिवसांचा कालावधी उलटल्यावरही भूमी अभिलेख विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांना हा घोटाळा करणारे अधिकारी व कर्मचारी दिसत नसून, त्यांची तपासणी सुरू असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. यावरून या विभागातील सध्याचे अधिकारी त्यांच्या खात्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना वाचविण्यासाठी आटापिटा करीत असल्याचे वृत्त आहे. अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन भूखंड हडपला. सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, आतापर्यंत दोन अधिकारी व ११ कर्मचार्‍यांचे बयान नोंदविले. यासोबतच हा भूखंड हडप करणारा गजराज मारवाडी याची कोतवाल बुकाची नक्कलही काढली असून, यामध्ये मारवाडी हेच आडनाव वापरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मारवाडी यांच्या कुटुंबीयांमध्ये झांबड हे आडनाव कुठेही वापरले नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे आता हा भूखंड हडप करणार्‍या या बड्या व्यापार्‍याच्या नावावर पोलीस तपासात शिक्कामोर्तब झाला. आता हे प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे सादर करण्यात येणार असून, त्यांचे आदेश मिळताच फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

दिरंगाई करणार्‍यांनाही आरोपी करा!भूमी अभिलेख विभागातील संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड हडप करणार्‍यांमध्ये भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी असल्याचे याच विभागाने दिलेल्या खुलाशात कबूल केले आहे; मात्र आता १५ दिवसांचा कालावधी उलटला असतानाही हा प्रताप करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची नावे पोलिसांना देण्यात आलेली नाहीत. एवढेच काय, तर भूमी अभिलेख विभागाने खात्यांतर्गत अद्यापही त्यांच्यावर  कारवाई  केली नसल्याने दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी तक्रारकर्ते अमर डिकाव यांनी केली आहे.