शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

निवासी क्रीडा प्रबोधिनीकरिता खेळाडूंना सरळ प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 14:53 IST

अकोला: महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये २०१९-२० करिता राज्यातील ११ क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश मिळणार आहे.

अकोला: महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये २०१९-२० करिता राज्यातील ११ क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश मिळणार आहे. याकरिता २४ जूनपासून खेळनिहाय कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहेत.२०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता राज्यातील एकूण ११ क्रीडा प्रबोधिनींमध्ये प्रवेशाकरिता सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणी अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्याकरिता मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याकरिता क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्य स्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू, ज्यांचे वय १९ वर्षांआतील आहे. अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ज्ञ समितीसमक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जाणार आहे. सरळ प्रवेश प्रक्रिया २४ व २५ जून रोजी आयोजित केली आहे, तर खेळनिहाय कौशल्य चाचणी २५ व २६ जून रोजी आयोजित केली आहे. यानुसार आर्चरी खेळाची चाचणी क्रीडा प्रबोधिनी अमरावती, हॅण्डबॉल खेळाची चाचणी नागपूर येथे, बॉक्सिंगची चाचणी अकोला येथे घेण्यात येणार आहे. अ‍ॅथलेटिक्स, जलतरण, सायकलिंग, शुटिंग, ज्युदो, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, टेबल-टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिक खेळाची चाचणी शिवछत्रपती क्रीडापीठ, बालेवाडी-म्हाळुंगे, पुणे येथे घेण्यात येणार आहे.चाचणी देण्याकरिता येणाऱ्या खेळाडूंची चाचणीला जाण्यापूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक (बॉक्सिंग) सतीशचंद्र भट्ट, राज्य क्रीडा मार्गदर्शक (कुस्ती) लक्ष्मीशंकर यादव यांच्याशी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई क्रीडांगण येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, अशी माहिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाVasant Desai Stadiumवसंत देसाई क्रीडांगण