शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अकोला रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी मोजावे लागणार ५० रुपयेे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 10:29 IST

Akola railway station अकोला, शेगाव, बडनेरा, अमरावती, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, मनमाड व खंडवा या रेल्वेस्थानकांवर आता प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार आहे.

ठळक मुद्देअकोल्यासह काही निवडक रेल्वेस्थानकांमध्ये ५० रुपयांमध्ये प्लॅटफॉर्म तिकीट मिळणारफलाटांवर जाणाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.

अकोला : भारतीय रेल्वेने अनलॉक अंतर्गत विशेष गाड्या चालवित प्रवासी वाहतूक खुली केल्यानंतर आता प्लॅटफॉर्मवरील प्रवेशही खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाअंतर्गत अकोल्यासह काही निवडक रेल्वेस्थानकांमध्ये ११ मार्चपासून ५० रुपयांमध्ये प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार असून, ही सुविधा १० जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

कोरोना विषाणू महामारीच्या पृष्ठभूमीवर गतवर्षी रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेअंतर्गत विशेष गाड्या चालवून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तथापि, या गाड्यांमधून केवळ कन्फर्म तिकिटावरच प्रवास करता येतो. या काळात फलाटांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटही बंदच करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोबत येणाऱ्यांना फलाटांवर जाता येत नव्हते. केवळ प्रवासाचे आरक्षित तिकीट असलेल्यांनाच फलाटांवर जाता येत होते. आता मात्र मध्य रेल्वेने काही रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळ मंडळाअंतर्गत अकोला, शेगाव, बडनेरा, अमरावती, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, मनमाड व खंडवा या रेल्वेस्थानकांवर आता प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार आहे. तथापि, त्यासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. फलाटांवर जाणाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.

टॅग्स :Akola Railway Stationअकोला रेल्वे स्थानकAkolaअकोला