शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळला; मनपाने ठोठावला दहा हजारांचा दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 12:18 IST

तेलीपुरा चौकातील ए-वन बॅग प्रतिष्ठानवर प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला. याप्रकरणी दोन्ही व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई मनपाच्या आरोग्य निरीक्षकांनी केली.

अकोला: शासनाने प्लास्टिकपासून तयार केल्या जाणाऱ्या पिशव्यांसह विविध साहित्याच्या वापरावर बंदी घातली असली तरी अद्यापही शहरातील व्यावसायिक प्लास्टिक पिशव्या व साहित्याचा वापर करीत असल्याचे समोर येत आहे. सोमवारी दक्षिण झोन अंतर्गत येणाºया गोरक्षण रोडस्थित इन्कमटॅक्स चौकातील जैन क्रिएशन व उत्तर झोनमधील तेलीपुरा चौकातील ए-वन बॅग प्रतिष्ठानवर प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला. याप्रकरणी दोन्ही व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई मनपाच्या आरोग्य निरीक्षकांनी केली.प्लास्टिकपासून विविध वस्तू तयार केल्या जातात. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाला हानी होत असल्याचे समोर आल्यानंतर राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांसह इतर वस्तू व थर्माकॉलच्या वापरावर बंदी घातली आहे. महापालिका प्रशासनाकडून यासंदर्भात वेळोवेळी आवाहन केले जात असले तरी काही व्यावसायिक, दुकानदार प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. अशा व्यावसायिकांच्या दुकानांची तसेच प्रतिष्ठाणांची तपासणी करून संबंधितांविरोधात कारवाई केल्या जात आहे. सोमवारी दक्षिण झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पूनम कळंबे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य निरीक्षकांनी गोरक्षण रोडवरील इन्कमटॅक्स चौकातील जैन क्रिएशन प्रतिष्ठानची झाडाझडती घेण्यात आली असता, प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला. हा साठा ताब्यात घेऊन व्यावसायिकाला पाच हजार रुपये दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात आली. उत्तर झोन अंतर्गत तेलीपुरा चौकातील एवन बॅग दुकानाची तपासणी केली असता बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. याप्रकरणी संबंधित व्यावसायिकाला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका