शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात ‘प्लाझ्मा थेरपी’ची अद्याप अंमलबजावणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 11:39 IST

रुग्णांची प्लाझ्मा देण्यास टाळाटाळ अन् रुग्णांपर्यंत पोहोचण्यास असमर्थ असलेल्या आरोग्य यंत्रणेमुळे विभागात अद्यापही ‘प्लाझ्मा थेरपी’ची अंमलबजावणी झाली नाही.

अकोला : आरोग्य विभागाच्या अकोला मंडळात अकोल्यासह अमरावती आणि यवतमाळ येथे प्लाझ्मा थेरपीला शासनाने मान्यता दिली होती; परंतु किचकट प्रक्रियेमुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची प्लाझ्मा देण्यास टाळाटाळ अन् रुग्णांपर्यंत पोहोचण्यास असमर्थ असलेल्या आरोग्य यंत्रणेमुळे विभागात अद्यापही ‘प्लाझ्मा थेरपी’ची अंमलबजावणी झाली नाही.कोरोनावर अद्यापही प्रभावी औषध आले नाही; परंतु प्लाझ्मा थेरपीकडे अनेक जण आशेने बघत आहे. शासनातर्फेही या थेरपीला मान्यता दिल्याने आरोग्य विभागाच्या अकोला मंडळात अकोल्यासह अमरावती आणि यवतमाळ या ठिकाणी तशी तयारीदेखील करण्यात आली आहे. प्लाझ्मा संकलनासाठी आरोग्य यंत्रणेतर्फे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची यादीही काढली; परंतु किचकट प्रक्रिया आणि बरे झालेल्या रुग्णांच्या अनुत्साहामुळे आरोग्य यंत्रणेला प्लाझ्मासाठी रक्त संकलनात अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर बरे झालेल्या रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य यंत्रणेला कमी मनुष्यबळाचाही सामना करावा लागत आहे.अनेकांमध्ये अ‍ॅन्टी बॉडिजचे प्रमाण कमीआतापर्यंत विभागात समोर आलेल्या कोरोनाच्या बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य किंवा कुठलीच लक्षणे नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या शरीरात कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी अ‍ॅन्टी बॉडिज विकसित झाल्याच नाहीत किंवा फार कमी झाल्या आहेत. त्यामुळे अशा रुग्णांच्या रक्ताचा फायदा प्लाझ्मा थेरपीमध्ये होऊ शकत नाही.२८ दिवसांची प्रतीक्षालक्षणे असलेला रुग्ण बरा झाल्यानंतर २८ दिवसांनी प्लाझ्मा थेरपीसाठी त्याचे रक्त संकलन करावे लागते. सुरुवातीला कोरोनातून पूर्ण बरे झालेल्या रुग्णांसोबत प्रभावी संपर्क झाले नाही; परंतु गत काही दिवसात बरे झालेल्या रुग्णांसोबत आरोग्य यंत्रणा संपर्क साधत आहेत; मात्र त्यांच्याकडून प्लाझ्मासाठी रक्त संकलनासाठी २८ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.कोण करू शकतो प्लाझ्मा दान?

  • ज्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे होती.
  • हिमोग्लोबिन १२.५ असणे आवश्यक
  • वजन ५० किलोपेक्षा जास्त असणे आवश्यक
  • १८ ते ६० वर्ष वयोगटातील रुग्ण

बरे झालेल्या रुग्णांकडून प्लाझ्मासाठी रक्त संकलनात अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही डोनरसोबत संपर्क झाला आहे. त्या दृष्टिकोनातून पुढील प्रक्रिया सुरू आहे.- डॉ. श्रीराम चोपडे, विभाग प्रमुख, शासकीय ब्लड बँक, जीएमसी, अकोला

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या