शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या धर्तीवर राबविणार प्लाझ्मा थेरपी जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 10:18 IST

राज्यभरात प्लाझ्मा थेरपीविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

अकोला : कोरोनावर प्रभावी औषध नसले, तरी प्लाझ्मा थेरपीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे; मात्र यासाठी आवश्यक प्लाझ्मा देण्यासाठी कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने आता राज्यभरात प्लाझ्मा थेरपीविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी थेट कोविड रुग्ण भरती असलेल्या वॉर्डपासूनच सुरुवात केली जाणार आहे.प्लाझ्मा थेरपीविषयी जनजागृतीचा हा उपक्रम दिल्लीच्या धर्तीवर राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे. कोविडची लक्षणे असणारी व्यक्तीच प्लाझ्मा दान करू शकत असल्याने ही मोहीम थेट कोविड वॉर्डातच राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कोविड वॉर्डामध्ये जनजागृतीविषयी फलके लावण्यात येणार आहेत. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे एक परिपत्रक काढण्यात आले असून, त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.रुग्णांचे समुपदेशनही होईलकेवळ कोविड वॉर्डात जनजागृती फलक लावून ही मोहीम यशस्वी होणार नाही. त्यामुळे रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांचे समुपदेशनही केले जाणार असल्याची माहिती आहे. हा प्रयोग शसस्वी झाल्यास प्लाझ्मा दाते सहज उपलब्ध होण्यास मदत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासनाच्या परिपत्रकानुसार, कोविड वॉर्डात फलकांद्वारे जनजागृती केली जाणार आहे. शिवाय, कोविड रुग्णांशी विविध माध्यमातून संवाद साधून त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न राहील.- डॉ. श्रीराम चोपडे, विभाग प्रमुख, शासकीय रक्तपेढी,जीएमसी, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या