शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी संपूर्ण कापूस खरेदीचे नियोजन; दैनंदिन शेतकरी संख्या वाढविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 16:13 IST

दैनंदिन कापूस खरेदीसाठी शेतकºयांच्या गाड्यांची संख्या वाढवून प्रत्येक केंद्रासाठी नियोजन करून दिले आहे.

अकोला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे असलेला कापूस पावसाळ्यापूर्वी खरेदी करण्यासाठी प्रत्येक केंद्रात दरदिवशी किमान २०० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास ७० टक्के शेतकºयांचा कापूस घरातच राहणार आहे. हा प्रकार टाळण्यासाठी आता पालकमंत्री बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार सहकारी उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दैनंदिन कापूस खरेदीसाठी शेतकºयांच्या गाड्यांची संख्या वाढवून प्रत्येक केंद्रासाठी नियोजन करून दिले आहे. सोबतच शेतकºयांना कापूस विक्रीसाठी २६ मेपर्यंत नोंदणी करता येईल, असे आवाहनही केले आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व कापूस खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आली; मात्र जिनिंग, प्रेसिंग युनिट सुरू झालेले नव्हते. कापूस खरेदीकामी काही जिनिंग, प्रेसिंग युनिटधारक कापूस पणन महासंघ व सीसीआय यांना सहकार्य करीत नसल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच किरकोळ कारणाने काम बंद ठेवत आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी सातत्याने झाल्याने यापुढे असा प्रकार घडल्यास युनिटधारकांविरुद्ध कारवाई करण्यासोबतच लायसन रद्द केले जाईल, असा इशारा जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी आधीच दिला. सोबतच पालकमंत्री कडू यांनीही २१ मे रोजीच्या बैठकीत निर्देश दिले. त्यानुसार कोणत्याही शेतकºयाचा कापूस घरात राहणार नाही, असे बजावले आहे. शेतकºयांना नोंदणीसाठी मुदतही वाढवून देण्यात आली आहे. तसेच कापूस खरेदी केंद्रातून किमान दोन दिवस आधीच त्यांना तसा निरोप द्यावा, असेही बजावण्यात आले आहे. नियोजनाप्रमाणे खरेदी केंद्रावर दैनंदिन कापूस गाड्यांची संख्या ठरवून दिली आहे. त्यामध्ये ‘सीसीआय’च्या अकोला तालुक्यातील चिखलगाव येथे १०० तर २६ मेनंतर ३०० शेतकरी संख्या ठरली आहे. पातूर-५०, बार्शीटाकळी-१५० तसेच शेतकºयांचा कापूस खरेदी करून २९ मे रोजी केंद्रातील खरेदी बंद केली जाणार आहे. अकोट-३००, हिवरखेड-५०, मूर्तिजापूर-१५०, बाळापूर-५०, पणन संघाच्या केंद्राच्या अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, कानशिवणी-१००, तेल्हारा-५०, (अतिरिक्त ग्रेडर मिळाल्यानंतर २०० प्रति दिन) या नियोजानुसार ‘सीसीआय’कडून दैनंदिन ८५० शेतकरी तर पणन महासंघाकडून १५० शेतकºयांचा कापूस खरेदी केला जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाcottonकापूसFarmerशेतकरी