शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत अडकला पाणीटंचाई निवारणाचा आराखडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 10:57 IST

पाणीटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा जिल्हा परिषदेत अडकल्याने, प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया रखडली आहे

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी दुसऱ्या व तिसºया टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा जिल्हा परिषदेमार्फत अद्याप तयार करण्यात आला नाही. पाणीटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा जिल्हा परिषदेत अडकल्याने, प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला दिला आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणे, विहिरी, तलावांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला असला तरी, पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अखेरपर्यंत या दुसºया व तिसºया टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत १९ आॅक्टोबर व २ डिसेंबर रोजीच्या पत्राद्वारे जिल्हा परिषदेला देण्यात आले; परंतु जिल्हा परिषदेमार्फत पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा अद्याप तयार करण्यात आला नसल्याने, कृती आराखड्यास जिल्हाधिकाºयांकडून प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया रखडली. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तातडीने तयार करून, मान्यतेसाठी सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ४ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेला पत्राद्वारे दिला आहे.मुदत संपली; पण सादर केला नाही आराखडा!जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी दुसºया व तिसºया टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार करून ६ जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांमार्फत ४ जानेवारी रोजीच्या पत्राद्वारे जिल्हा परिषदेला देण्यात आला. त्यानुसार पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याची मुदत संपून चार दिवस उलटले; मात्र जिल्हा परिषदेमार्फत १० जानेवारीपर्यंत पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला नाही.जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांकडून (बीडीओ) उपाययोजनांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे व मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.-किशोर ढवळे,कार्यकारी अभियंता, जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद