शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात ३८ ते ४० हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 14:21 IST

पाटबंधारे विभागाने यावर्षी विक्रमी म्हणजे ३८ ते ४० हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे; परंतु हे पाणी सोडणार केव्हा, हा प्रश्न आहे.

अकोला : जिल्ह्यात प्रकल्प तुडुंब भरलेले असून, रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाने यावर्षी विक्रमी म्हणजे ३८ ते ४० हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे; परंतु हे पाणी सोडणार केव्हा, हा प्रश्न आहे.काटेपूर्णा प्र्रकल्पात जुलै महिन्यापर्यंत अत्यंत अल्प जलसाठा शिल्लक राहिल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट उभे ठाकले होते. इतरही सर्वच धरणांचा जलसाठा तळाला लागला होता. परतीच्या पावसाने सर्वच प्रकल्पातील जलसाठा वाढला असून, सर्वच मोठे, मध्यम प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे. यावर्षी अकोला पूर संरक्षण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दगडपारवा प्रकल्पातही आजमितीस मुबलक जलसाठा आहे. काटेपूर्णा व वान या मोठ्या प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे. मोर्णा, निर्गुणा मध्यम प्रकल्पातही शंभर टक्के जलसाठा असून, उमा प्रकल्पात जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी असल्याने सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.काटेपूर्णा प्रकल्पातून ८ हजार हेक्टरवर सिंंचनासाठी पाणी सोडण्यात येत असते. यावर्षी या प्रकल्पातून रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतीला पाणी सोडण्यात येणार आहे.अकोला उपविभागांतर्गत मोर्णा, निर्गुणा व दगडपारवा प्रकल्पातून १२ हजार हेक्टरवर सिंंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. उमा व घुंगशी बॅरेजमधून रब्बी हंगामाला पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी हे सर्व प्रकल्प मिळून ३८ ते ४० हजार हेक्टरवर सिंचन व्यवस्था अपेक्षित असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे म्हणणे आहे.रब्बी पिकांंसाठी यावर्षी पाणी सोडण्यात येणार असले तरी उन्हाळी पिकांबाबत साशंकता आहे. अकोला उपविभागांतर्गत मात्र उन्हाळी पिकांना पाणी सोडण्यात येण्याची शक्यता पाटबंधारे अभियंत्याकडून वर्तविण्यात येत आहे. काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात येणार की नाही, हे रब्बी हंगामातील पाणी वापरल्यानंतर कळणार आहे; परंतु शेतकऱ्यांना मात्र उन्हाळी पिकांनाही पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :AkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेतीFarmerशेतकरी