शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात ‘रेणू’ योजना राबविण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:17 IST

‘रेणू’ उपक्रमाची सुरुवात अकोला जिल्हा परिषदेतून सुरू करण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चालविला आहे.

अकोला : ग्रामीण भागातील महिलांना उद्योग निर्मिती, त्याचा विकास आणि संचालनातून रोजगार निर्मितीचा उपक्रम म्हणून अकोला जिल्ह्यात ‘रेणू’ योजना राबविण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. त्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेसह सर्वच बँकांना पत्र देत त्याबाबत माहिती देण्यात आली आहे.महिलांमध्ये उद्योगाबाबत रुची निर्माण करणे, तसेच समूहातील नेतृत्व तयार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. ‘रेणू’ उपक्रमाची सुरुवात अकोला जिल्हा परिषदेतून सुरू करण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चालविला आहे. महिला उद्योग निर्मितीसाठी सक्षम यंत्रणांच्या मंजुरीनंतरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी महिला बचत गट आणि त्यांच्या उद्योग प्रकल्पांची पाहणी निकषानुसार करण्याचेही सांगण्यात आले आहे. या उपक्रमासाठी मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया, स्टार्ट अप इंडिया किंवा स्वयं साहाय्यता बचत गटांसाठी कर्ज घेतलेले समूह पात्र ठरणार आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही गावात त्या बचत गटाचे नोंदणीकृत कार्यालय आवश्यक आहे. कोणत्याही योजनेतील कर्ज मंजुरी लगतच्या म्हणजे, २०१८-१९ किंवा २०१९-२०२० या वर्षातीलच असावी, तसेच महिला उद्योग, बचत गटांचे बँक खाते थकीत असू नये किंवा कोणत्याही कारणास्तव निधी इतरत्र वापरलेला नसावा, या निकषावर ही तपासणी केली जात आहे.या निकषानुसार पात्र महिला समूह, बचत गटांची माहिती बँकांकडून मागविण्यात आली. त्या महिलांची कार्यशाळा जिल्हा परिषदेत घेतली जाईल. त्यामध्ये रेणू योजनेची निवड प्रक्रिया त्यांना सांगितली जाणार आहे. निवड झालेल्या समूहांना अनुदान मिळणार आहे. त्यासाठी त्यांना मॉर्जिन मनीची अट आहे. सोबतच केंद्र शासनाच्या इतर योजनांतून मिळालेल्या कर्जाचाही त्यामध्ये सहभाग असेल. ही योजना जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुरू होत आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद