शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयात आता ‘प्लेसमेंट’ सेल

By admin | Updated: January 26, 2015 01:32 IST

यूजीसीच्या निर्देशानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी.

अकोला : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधूनच कुशल कामगार मिळावे, या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट सेल सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अखत्यारित कार्यरत विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांना मोठे महत्त्व आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये सर्वाधिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आढळतात; परंतु या अभ्यासक्रमातून उद्योगधंद्यांना आवश्यक असा कुशल कामगार मिळत नसल्याची ओरड उद्योजकांकडून वारंवार होते असते. त्यानुसार नॅशनल स्किल डेव्हलपमेंट (एनएसडीसी) अंतर्गत उपाययोजना राबविण्याचा विचार पुढे आला. या अंतर्गत कुशल कामगार मिळविण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर कौशल्य विकास योजना राबविण्याचा विचार पुढे आला. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुकाणू समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत देशातील सर्व विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट सेल उभारण्याची सूचना करण्यात आली. या सूचनेवर नंतर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्लेसमेंट सेल अंतर्गत विविध कंपन्यांचे प्रतिनिधी महाविद्यालयांमध्ये जाऊन कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतील, सोबतच या सेल अंतर्गत वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिरांचेदेखील आयोजन केले जाणार आहे. महाविद्यालयांनी सुरू केलेल्या प्लेसमेंट सेल आणि कौशल्य विकासाच्या इतर कार्यक्रमासंदर्भात महाविद्यालयांना वार्षिक अहवाल शैक्षणिक वर्षाच्या शेवटी विद्यापीठ अनुदान आयोगाला सादर करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीसाठी आणि कुशल कामगार मिळविण्यासाठी या सेलचा मोठा उपयोग होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांनादेखील शिक्षण घेत असतानाच नोकरी मिळविण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे. परिणामी बेरोजगारीवरदेखील आळा बसणार आहे.