अकोला - शिवर येथील रहिवासी एका युवकास तिघांनी संगनमताने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी सदर तीनही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, जखमी युवकावर उपचार सुरू आहेत. शिवर येथील रहिवासी राजेश नीळकंठ बोदडे हा रविवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावरील सनी बोअरवेल येथे उभा असताना त्याला सुभाष आठवले, रमन आठवले व पंकज चक्रनारायण या तिघांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर या तिघांनी त्याच्यावर पाइपनेही हल्ला केल्याने यामध्ये राजेश गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती सिव्हिल लाइन पोलिसांना मिळताच त्यांनी जखमी राजेशला तातडीने सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर राजेश बोदडे याच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी सदर तीनही युवकांविरुद्ध कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पूर्व वैमनस्यावरून पाइपने मारहाण
By admin | Updated: May 5, 2015 01:23 IST