शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर बोंडअळी; कृषी शास्त्रज्ञांची उडाली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:21 IST

अकोला : शेकडो उपाययोजना करू नही यावर्षी गुलाबी बोंडअळीचे दर्शन झाल्याने कृषी विभागासह कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची झोप उडाली आहे.

ठळक मुद्देविदर्भातील कपाशी क्षेत्रावर प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एका खासगी कंपनीसोबत घेतला. सुरुवातीला अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी एका गावाची निवड केली आहे. या गावात प्रात्यक्षिक कामाला रविवारपासून सुरुवातही करण्यात आली आहे.

अकोला : शेकडो उपाययोजना करू नही यावर्षी गुलाबी बोंडअळीचे दर्शन झाल्याने कृषी विभागासह कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची झोप उडाली आहे. या अनुषंगाने विदर्भातील कपाशी क्षेत्रावर प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एका खासगी कंपनीसोबत घेतला असून, सुरुवातीला अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी एका गावाची निवड केली आहे. या गावात प्रात्यक्षिक कामाला रविवारपासून सुरुवातही करण्यात आली आहे.मागीलवर्षी विदर्भातील कापूसपट्ट्यात गुलाबी बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान केल्याने यावर्षी कृषी विद्यापीठानेही दक्षता घेतली असून, कृषी विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत शेतकऱ्यांना बोंडअळीच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना, शेतकºयांना मार्गदर्शनावर भर दिला जात आहे. बोंडअळीसोबतच कपाशीवर रसशोषण करणाºया किडींचा प्रादुर्भाव अलीकडच्या काही वर्षात जास्त वाढल्याने यावर्षी या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून दखल घेण्यात आली आहे. पण, या सर्व किडींना अनुकूल हवामान निर्माण झाल्याने यावर्षीही गुलाबी बोंडअळी समोर आली असून, अकोला जिल्ह्यासह वर्धा जिल्ह्यात सुरुवातीलाच बोंडअळीचे दर्शन झाल्याने कृषी विभागाच्या अधिकाºयांसह कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांची झोप उडली आहे. या अनुषंगाने बोंडअळी व रसशोषण करणाºया किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी सुरुवातीला अकोला जिल्ह्यातील कौलखेड गोमासे येथील १८८ एकर व यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा (खुर्द) गाव शिवारातील १४५ एकर प्रक्षेत्रावर कापूस पिकाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. पारंपरिक पद्धतीने कापूस पिकाचे व्यवस्थापन न करता कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कापूस पिकाचे व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढीसाठी फायदा होईल, या दृष्टीने शेतकºयांना या प्रात्यक्षिक कार्यक्रमातून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

 गुलाबी बोंडअळी, रस शोषण करणाºया किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी कपाशी क्षेत्रावर प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात येत असून, शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कापूस पिकाचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला मार्गदर्शनातून शेतकºयांना देण्यात येत आहे.डॉ. दिलीप मानकर,संचालक,विस्तार शिक्षण,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठagricultureशेती