शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळखुटा-चांगेफळ नदीपात्रातून वाळू व मातीची अवैध वाहतूक सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 20:19 IST

खेट्री (अकोला): पातूर तालुक्यातील चान्नी व सस्ती मंडळात वाळूचे उत्खनन करून  अवैध वाहतूक रात्रंदिवस सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जी पणामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. 

ठळक मुद्देजेसीबी मशीनद्वारे होतेय उत्खनन महसूल विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कखेट्री (अकोला): पातूर तालुक्यातील चान्नी व सस्ती मंडळात वाळूचे उत्खनन करून  अवैध वाहतूक रात्रंदिवस सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जी पणामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. चान्नी येथील महसूल मंडळाच्या अवघ्या अडीच-तीन किलोमीटर अंतरावर पिं पळखुटा-चांगेफळ नदीपात्रातून जेसीबी मशीनद्वारे वाळू व मातीचे उत्खनन करून  अवैध वाहतूक सुरू आहे. पिंपळखुटा येथील मन उतावळी नदीवरील पिंपळखुटा  गावाजवळील १७७, १७८, १७९, १८३, १८४, १८५, १८६ या घाटांचे लिलाव  झालेले आहेत. परंतु, या लिलाव झालेल्या घाटांच्या नावावर पिंपळखुटा- चांगेफळदरम्यान नदीपात्रातून शेकडो ब्रास वाळू व मातीचे उत्खनन करण्यात आले  आहे. तसेच सस्ती मंडळांतर्गत खेट्री, शिरपूर येथील विश्‍वमित्र नदीपात्रातूनसुद्धा वाळूचे  उत्खनन करून अवैध वाहतूक करण्यात येत आहे. महसूल विभागाचा वाळू  माफियांवरील वचक संपल्याने वाळू माफिया नदीपात्रात रात्रंदिवस उत्खनन करून  वाळूची अवैध वाहतूक करीत आहेत. 

दरड कोसळल्याच्या घटना सुरूच!पिंपळखुटा-चांगेफळ नदीपात्रातून मजूर वाळू काढत असताना अनेकवेळा दरड  कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, सुदैवाने प्राण हानी झाली नाही. महसूल  विभागाने वेळीच लक्ष न दिल्यास मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

तहसीलदारांच्या आदेशाची पायमल्ली!वाळू व मातीचे अवैध उत्खनन व अवैध वाहतूक करणार्‍या माफियांवर दंडात्मक  कारवाई करण्याचे सक्त आदेश पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्‍वर पुरी यांनी मंडळ  अधिकारी, तलाठी व पोलिसांना दिले असले, तरी संबंधित दोन्ही मंडळ  अधिकार्‍यांकडून व पोलिसांकडून ठोस कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे  तहसीलदारांच्या आदेशाची पायमल्ली होत  असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

गाव पातळीवरील कर्मचारी व पदाधिकार्‍यांना वेळोवेळी लक्ष ठेवून गौण खनिजांचे  अवैध उत्खनन व अवैध वाहतूक करणार्‍या लोकांवर कठोर कारवाई करण्याबाबत  सांगितले आहे. तसेच आतापर्यंत नियमानुसार कारवाई केली आहे आणि पुढेही करण्या त येईल.पी.एस. रौंदळे, मंडळ अधिकारी, चान्नी.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण