....................फोटो....................
हाताला काम नाही; संसाराचा गाडा चालविण्याची चिंता!
पाऊस नसल्याने पिकांचं काही खरं नाही. शेतीची कामे बंद असल्याने शेतमजुरांच्या हाताला काम नाही. काम नसल्याने संसाराचा गाडा कसा चालणार, याबाबतची चिंता सतावत आहे, अशी व्यथा घुसरवाडी येथील शेतमजूर महिला इंदुबाई दामोदर घावट यांनी व्यक्त केली.
................फोटो.................
शेतमजूर म्हणतात..........
दरवर्षी यावेळी शेतामध्ये निंदणी व इतर कामे सुरू असतात. मात्र, यंदा पाऊस थांबल्याने शेतीची कामे बंद आहेत. त्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम नाही. एखाद्या दिवशी एखाद्या शेतात काम मिळते. त्यापोटी २०० रुपयांची मजुरी मिळते; परंतु नेहमी काम मिळत नसल्याने दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बचत गटांकडून कर्ज घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, यासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणी लाखोंडा येथील शेतमजूर महिला गोदावरी रामागरे, मंजुळा भांडे, हिराबाई रामागरे, योगिता रामागरे, ज्योती बुध, कांता इंगळे, दीपाली पांडे, कांता भांडे यांनी केली आहे.
................फोटो....ग्रुप....................
पाऊस नसल्याने शेतीची कामे सुरू नसल्याने शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे पोट कसं भरणार, याबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतमुजरांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, यासाठी सरकारने उपाययोजना केली पाहिजे, असे मत घुसरवाडी येथील शेतमजूर प्रमिला घावट, रेश्मा घावट, मीना घावट, शीला घावट, राजकन्या घावट व सुधाकर घावट यांनी व्यक्त केले.
.............फोटो........ग्रुप..............