शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

उघड्यावरच पिली जाते दारू! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:20 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वाईन बार, दारूची दुकाने बंद झाली होती. त्यामुळे महिला वर्गात आनंद व्यक्त झाला; परंतु आता पुन्हा दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्याबरोबर लगेचच वाईन बार, वाईन शॉप पटापट उघडल्याने मद्यपींच्या आनंदाला तर उधाण आले. शहरातील काही वाईन शॉप मालकांनी तर देशी, विदेशी दारू विक्रीसोबतच मद्यपींच्या पिण्याची सुद्धा सोय केली आहे. नियमानुसार वाईन शॉप मालकांना दारू विक्री करता येते; परंतु पिण्याची व्यवस्था करता येत नाही. असे असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांच्या नाकावर टिच्चून वाईन शॉपलगतच मद्यपी दारू रिचवित आहेत. 

ठळक मुद्देनियमांची पायमल्लीराज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्षपानटपर्‍या, हातगाड्या बनल्या दारूचे अड्डे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वाईन बार, दारूची दुकाने बंद झाली होती. त्यामुळे महिला वर्गात आनंद व्यक्त झाला; परंतु आता पुन्हा दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्याबरोबर लगेचच वाईन बार, वाईन शॉप पटापट उघडल्याने मद्यपींच्या आनंदाला तर उधाण आले. शहरातील काही वाईन शॉप मालकांनी तर देशी, विदेशी दारू विक्रीसोबतच मद्यपींच्या पिण्याची सुद्धा सोय केली आहे. नियमानुसार वाईन शॉप मालकांना दारू विक्री करता येते; परंतु पिण्याची व्यवस्था करता येत नाही. असे असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांच्या नाकावर टिच्चून वाईन शॉपलगतच मद्यपी दारू रिचवित आहेत. ‘लोकमत’ चमूने गुरुवारी शहरातील काही वाईन शॉप मालकांनी मद्यपींसाठी दारू पिण्यासाठी केलेल्या व्यवस्थेचे स्टिंग ऑपरेशन केले. स्टिंगदरम्यान शहरातील खुले नाट्यगृहासमोरील एका वाइन शॉपलगतच मद्यपींना दारू पिण्याची सोय केल्याचे दिसून आले. अनेक मद्यपी वाईन शॉपवर येऊन दारूच्या बाटल्या विकत घेतात. शॉपचालकाकडून त्यांना पाण्याचे पाउच, पाण्याची बाटली आणि प्लास्टिकचे ग्लास उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे मद्यपी बाजूलाच जाऊन बाटलीतील दारू रिचवितात. तसेच रामदासपेठ परिसरात नव्याने सुरू झालेले वाईन शॉप, रेल्वे स्टेशन रोडवरील वाईन शॉपलगतसुद्धा असा प्रकार पाहायला मिळाला. या वाईन शॉपसमोर तर अनेकांनी पाण्याचे पाउच, चकना विक्रीचे व्यवसाय सुरू केले आहेत. वाईन शॉपमधून दारूच्या बाटल्या विकत घ्यायच्या आणि हातगाडीवरील पाण्याचे पाउच, खाण्याचे साहित्य घेऊन कुठल्या तरी बंद दुकानाच्या समोर बसून मद्य प्राशन करण्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत. दारूसोबतच पाण्याचाही पैसा कमाविण्याच्या नादात वाईन शॉप चालक कायद्याचा भंग करीत आहेत. वाईन शॉप चालकांच्या या कृत्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांचे मूक सर्मथन आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

पानटपर्‍या, हातगाड्या बनल्या दारूचे अड्डेपोलीस मुख्यालयासमोरच काही पानटपर्‍या, हातगाड्या मद्यपींचे दारू पिण्याचे अड्डे बनले आहेत.  येथील पानटपर्‍यांवर शीतपेयासोबतच पाण्याच्या बाटल्या, पाउच, चकन्याची पाकिटे मद्यपींसाठी उपलब्ध आहेत. एवढेच नाहीतर येथील व्यावसायिकांनी दारू पिण्यासाठी मद्यपींना सोयसुद्धा उपलब्ध करून दिल्याचे स्टिंग ऑपरेशनदरम्यान दिसून आले. 

नेहरू पार्कसमोरील हॉटेल बनले बार! नेहरू पार्कसमोरील दोन हॉटेलला तर रात्रीच्यावेळी चक्क बारचे स्वरूप प्राप्त होते. या हॉटेलमध्ये मद्यपी दारूच्या बाटल्या घेऊन येतात. त्यांना हॉटेलमालकाकडून स्पेशल टेबल, पाणी, चकना, चटणी आणि वेटरची सुविधा पुरविण्यात येते. कायद्याच्या दृष्टिकोनातून हा नियमांचा भंग आहे. पोलीस कर्मचार्‍यांनासुद्धा याची माहिती आहे; परंतु अर्थपूर्ण संबंधांमुळे पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात.

नियमानुसार वाईन शॉप चालकाला मद्यपींची दारू पिण्याची व्यवस्था करता येत नाही. असा प्रकार कोणी करीत असेल, तर त्याच्यावर कारवाई करण्याची तरतूद आहे. परवानासुद्धा रद्द होऊ शकतो. - राजेश कावळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क