शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

तुरीने विक्रम गाठला; पहिल्यांदाच प्रतिक्विंटल दहा हजार रुपये पार, खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा

By रवी दामोदर | Updated: June 2, 2023 15:13 IST

देशांतर्गत तुरीचे उत्पादन यंदा घटले. त्यामुळे मागणी व भावही वाढले आहेत.

अकोला : गत काही दिवसांपासून तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दहा वर्षांत यंदा प्रथमच तुरीने दरवाढीचा उच्चांक गाठला असून, विक्रम नोंदवला आहे. शुक्रवार, दि.२ जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला आतापर्यंतचा उच्चांकी १०,३५० रुपये क्विंटल रुपये भाव मिळाला आहे. तसेच दिवसभर १ हजार ८६६ क्विंटलची आवक झाली आहे. देशांतर्गत तुरीचे उत्पादन यंदा घटले. त्यामुळे मागणी व भावही वाढले आहेत.

जिल्ह्यात सोयाबीन, कापसासह तुरीचीही मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. गतवर्षी ५० हजार हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली होती. अतिवृष्टी व सततच्या पावसाचा तुरीला फटका बसला. त्यात ऐन फुलधारणेच्यावेळी धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. सुरूवातीपासूनच तुरीला बाजारात चांगला दर मिळाला. सध्या स्थितीत तुरीला चकाकी आली असून, यंदा प्रथमच तूर १० हजार रुपये प्रति क्विंटल दरावर पोहोचली आहे. तुरीच्या दरात वाढ होत असल्याने आगामी खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त असलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आठ वर्षांत हमीभाव १ हजार ९७५ रुपयांनी वाढलेशासनाने गेल्या सात वर्षांमध्ये तुरीच्या हमीभावात अवघ्या १ हजार ९७५ रुपयांची वाढ केली आहे. सन २०१५-१६ या हंगामात तुरीला ४ हजार ६२५ रुपयांचा हमीभाव होता. २०१६-१७ या वर्षात ५०५० भाव देण्यात आला. टप्प्याटप्प्याने पुढील चार वर्षांत २०२०-२१ मध्ये तुरीला ६ हजार रुपये तर २०२१-२२ मध्ये ६३०० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. तसेच सन २०२२-२३ मध्ये तूरीला ६ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला होता.

देशात घटले तुरीचे उत्पादन, दर राहणार तेजीतदेशात यंदा तुरीच्या उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट झाली. त्यामुळे बाजारात टंचाई जाणवत असून, दुसरीकडे मागणीत वाढ झाली आहे. तसेच गेल्या हंगामातील शिल्लक साठाही कमी असल्याने तुरीच्या दरात तेजी आहे. जगभरातही तुरीचे उत्पादन घटले असून, भाव तेजीत आहे. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी आणखी टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार