शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

छायाचित्र प्रदर्शनातून उलगडला पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या फोटोग्राफीचा प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 14:30 IST

या प्रदर्शनात विविध विषयांवरचे १०० पेक्षा अधिक छायाचित्र ठेवण्यात आले होते.

अकोला : एक दिवसीय छायाचित्र प्रदर्शनात पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या फोटोग्राफीचा प्रवास उलगडण्यात आला. या प्रदर्शनात विविध विषयांवरचे १०० पेक्षा अधिक छायाचित्र ठेवण्यात आले होते. प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.अकोला, बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनच्यावतीने जानोरकर मंगल कार्यालयात ज्येष्ठ फोटोग्राफर ओलवे यांच्या डॉक्युमेंट्री, फोटोग्राफीच्या प्रदर्शनाचे आयोजन २९ फेब्रुवारीला करण्यात आले होते. या एक दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, मनपाच्या महापौर अर्चना मसने, आ. रणधीर सावरकर, तेजराव थोरात, जयंत मसने, डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले, मनपा विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांची उपस्थिती होती.ओलवे यांनी गत ३० वर्षाहून अधिक काळ समाजातील वंचित, बहिष्कृत, तळागातील घटकांचे प्रश्न आपल्या फोटोग्राफीच्या माध्यमातून प्रभावीरीत्या जगासमोर आणले आहेत. त्यामुळे हे प्रदर्शन कलाकारांसाठी मोठी पर्वणी ठरले असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच ओलवे यांच्या कारकिर्दीवर संवाद सत्र घेण्यात आले. यामध्ये ओलवे यांनी फोटोग्राफी आवड, करियर, पॅशन, व्यावसायिक दृष्टिकोन, समाजभान आदींसंदर्भात मार्गदर्शन करून विविध प्रश्नांचे निरसन केले. या प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, नागरिकांनी भेटी दिल्या. प्रदर्शनासाठी अकोला, बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र नायसे, उपाध्यक्ष नीरज भांगे, दिग्विजय देशमुख, सचिव नितीन देशमुख, सहसचिव राहुल गोटे, दत्तात्रय सरोदे, उमेश चाळसे, कोषाध्यक्ष योगेश उन्होने, राहुल तायडे, पंकज शेळके, सोहेल खान, पवन खारोडे व मनीष शिंदे यांनी पुढाकार घेतला. प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचे व्याख्यानयाप्रसंगी प्रा. गौतमीपुत्र आप्पा कांबळे यांचे व्याख्यान झाले. प्रा. कांबळे यांनी ‘सेक्युलर आर्ट मुव्हमेंट’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी अकोला, बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनचे पदाधिकारी व फोटोग्राफर्स उपस्थित होते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाExhibitionप्रदर्शन