लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्या १0 वर्षांमध्ये बेपत्ता झालेले, हरवलेले आणि अनोळखी मृतदेहांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पोलीस मुख्यालयातील दरबार सभागृहात शनिवारी आयोजित करण्यात आले होते. अकोला पोलिसांनी राबवलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिला.पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर आणि कैलास नागरे यांच्या उपस्थितीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, हरवलेल्या नातेवाइकांना शोधण्यासाठी नागरिकांनी छायाचित्र पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अनोळखी मृतदेहांची ओळख आणि हरवलेल्या नागरिकांच्या शोधासाठी हे छायाचित्र प्रदर्शन मोठे उपयोगी ठरणार आहे.
बेपत्ता व्यक्तींचे छायाचित्र प्रदर्शन
By admin | Updated: July 9, 2017 09:26 IST