शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीने झालेल्या नुकसानाचे फोटोही द्यावे लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:19 IST

अकोला : गुलाबी बोंडअळीने कापसाचे नुकसान झाले असल्यास त्याचे संयुक्त  सर्वेक्षण करून, तसा अहवाल दहा दिवसांत शासनाकडे सादर करावा लागणार  आहे. त्यासाठी पंचनामा केलेल्या शेताचा, पिकाचे नुकसान दर्शविणारा (जीपीएस  एनेबल) फोटोही अपलोड करण्याचे बजावण्यात आल्याने पाहणी करणार्‍या प थकातील कर्मचार्‍यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. 

ठळक मुद्देसंयुक्त सर्वेक्षण करणार्‍या पथकाची डोकेदुखी वाढली!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुलाबी बोंडअळीने कापसाचे नुकसान झाले असल्यास त्याचे संयुक्त  सर्वेक्षण करून, तसा अहवाल दहा दिवसांत शासनाकडे सादर करावा लागणार  आहे. त्यासाठी पंचनामा केलेल्या शेताचा, पिकाचे नुकसान दर्शविणारा (जीपीएस  एनेबल) फोटोही अपलोड करण्याचे बजावण्यात आल्याने पाहणी करणार्‍या प थकातील कर्मचार्‍यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. जिल्हय़ात गुलाबी बोंडअळीने कापूस पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.  अनेक आंदोलने, धरणे करून शासनाला वेठीस धरल्यानंतर ५ डिसेंबर रोजी  शासनाने राष्ट्रीय आणि राज्याच्या नैसर्गिक आपत्ती निधीतून मदत मिळण्यासाठीचे  प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून मागवले. त्यानुसार दहा दिवसांत सर्वेक्षण अहवाल  आणि त्यासाठी मदतीचा प्रस्तावही मागवला आहे. त्यासाठी ७ डिसेंबर रोजी  सर्वेक्षणाची पद्धतही ठरवून देण्यात आली. बोंडअळीने कापूस पिकाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी संयुक्त पाहणी  केली जाईल. त्यासाठी पथकामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांचा  समावेश आहे. पथकाचा पंचनाम्यासह अहवाल तालुकास्तरीय अधिकार्‍यांकडून  प्रपत्र अ, ब, क, ड मध्ये जिल्हाधिकार्‍यांकडे जाणार आहे. त्यावरून  नुकसानाबाबत मदतीचा प्रस्तावही तयार होणार आहे. 

तरच.. नुकसानाची मदत मिळण्याचा प्रस्ताव

पंचनामे करताना संबंधित कर्मचार्‍यांना पंचनामा होत असलेल्या ठिकाणाचा जी पीएस एनेबल अँपद्वारे फोटो काढावा लागणार आहे. त्याद्वारे नुकसानाच्या दाव्याची  पडताळणी केली जाणार आहे. सोबतच नुकसान झाल्याचे ठरवण्यासाठी संबंधित  िपकाची नोंद सात-बारावर असणे आवश्यक आहे. सोबतच पिकांचे नुकसान ३३  टक्क्यांपेक्षा अधिक असल्यासच नुकसानाची मदत मिळण्याचा प्रस्ताव तयार होणार  आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणagricultureशेतीcottonकापूस