शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विषयात ‘पीएचडी’ करणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:14 IST

अकोला : कृषी विषयात पीएचडी (आचार्य) करणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव प्रथमच अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शासनाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास आर्थिक कारणामुळे वंचित राहणार्‍या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पीएचडी करता येईल.

ठळक मुद्देशासनाला प्रस्ताव सादर; डॉ.पंदेकृविचा पाठपुरावा

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषी विषयात पीएचडी (आचार्य) करणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव प्रथमच अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शासनाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास आर्थिक कारणामुळे वंचित राहणार्‍या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पीएचडी करता येईल. राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली ही चार कृषी विद्यापीठे असून, या कृषी विद्यापीठांतर्गत खासगी व अनुदानित मिळून १९0 कृषी महाविद्यालयातून दरवर्षी हजारो विद्यार्थी कृषी विषयातील विविध (बीएससी, एमएससी) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. यातील एमएससी उत्तीर्ण हजारो विद्यार्थ्यांना पुढे विविध विषयांत पीएचडी करायची असते; तथापि अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने पीएचडी करता येत नाही. याच अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. इतर तीन कृषी विद्यापीठेही अनुकूल असून, याबाबतचा प्रस्ताव पाठवित आहेत. चारही कृषी विद्यापीठात दरवर्षी एक हजारांवर विद्यार्थी  कृषी, मत्स्य विज्ञान, वनशास्त्र, पशुसंवर्धन, सामाजिक विज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, बीटेक कृषी अभियांत्रिकी, बीटेक अन्न तंत्रज्ञान, कृषी जैव तंत्रज्ञान, कीटक शास्त्र, कृषी अर्थशास्त्र, वनस्पती शास्त्र, फलोत्पादन शास्त्र, कृषी हवामान शास्त्र असे अनेक विषयांत पीएचडीला प्रवेश घेतात. त्यासाठी या विद्यार्थ्यांना सामाईक (सीईटी) परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. पीएचडी हा देखील शिक्षणाचाच भाग आहे, पण कृषी एमएससी केल्यानंतर पीएचडीला शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यामुळे इच्छा व गुणवत्ता असूनही हजारो विद्यार्थी सीईटीच देत नाहीत. दरम्यान, अशा विद्यार्थ्यांना पीएचडी करण्याची संधी मिळावी, यासाठी शासनही अनुकूल असून शिष्यवृत्ती मिळेल, असा विश्‍वास कृषी विद्यापीठाला आहे. असे झाले तर प्रती महिना पंधरा हजार रुपयांच्या जवळपास ही शिष्यवृत्ती राहील, असे वृत्त आहे.

कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पीएचडी करता यावी, यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शासनही  याबाबत अनुकूल आहे. असे झाल्यास पीएचडीपासून वंचित राहणार्‍या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. डॉ.व्ही.एम. भाले, कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.   

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola cityअकोला शहर