शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पाचवा टप्पा:  जिल्ह्यातील ‘लॉकडाउन’चे स्वरूप आज ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 10:43 IST

पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यातील ‘लॉकडाउन’चे स्वरूप रविवारी जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी चौथ्या टप्प्यातील ‘लॉकडाउन’ची मुदत ३१ मे रोजी संपत असल्याने, पुढील लॉकडाउन संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यातील ‘लॉकडाउन’चे स्वरूप रविवारी जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात येणार आहे.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना १९ मे रोजी शासनामार्फत जाहीर करण्यात आल्या होत्या. चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनची मुदत ३१ मे रोजी मध्यरात्री संपुष्टात येत असल्याने, पुढील लॉकडाउन संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचना ३१ मे रोजी जाहीर होणार आहेत.शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर, त्यानुसार पुढील लॉकडाउन संदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यातील ‘लॉकडाउन’ स्वरूप ३१ मे रोजी जिल्हा प्रशासनामार्फत भरविण्यात येणार आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अकोला शहर ‘रेड झोन’मध्ये असल्याच्या पृष्ठभूमीवर ‘लॉकडाउन’चे पुढील स्वरूप निश्चित होण्याची शक्यता आहे.

‘जनता कर्फ्यू’ प्रस्तावाच्या मान्यतेकडे लक्ष!अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शहरात १ ते ६ जून दरम्यान सहा दिवसांच्या कालावधीत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय २८ मे रोजी सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. त्यानुषंगाने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाच्या मुख्य सचिवांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून, या प्रस्तावाला मुख्य सचिवांकडून मान्यता मिळते की नाही, याकडे आता लक्ष लागले आहे.पुढील लॉकडाउन संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील ‘लॉकडाउन’ संदर्भात पुढील स्वरूप रविवारी ठरविण्यात येणार आहे.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोला