शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंप संचालकांनी कामगार आयुक्तांना दाखविला ठेंगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:08 IST

अकोला : शहरातील एका नामी पेट्रोल पंप संचालकांच्या  विरोधात तब्बल २२ कर्मचार्‍यांनी कामगार आयुक्तांच्या  न्यायालयात तक्रार केली होती; मात्र पेट्रोल पंप संचालकांनी  तक्रार करणार्‍या कर्मचार्‍यांना दबावात घेतल्याने अनेकांनी  माघार घेतली.

ठळक मुद्देएका नामी पेट्रोल पंप संचालकांच्या विरोधात तक्रार कामगार आयुक्तांच्या न्यायालयात २२ कर्मचार्‍यांनी केली होती तक्रार तक्रार करणार्‍या कर्मचार्‍यांना दबावात घेतल्याने अनेकांनी घेतली माघार  तारखांवर हजर न राहता पेट्रोल पंप चालकाने दाखविला ठेंगा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील एका नामी पेट्रोल पंप संचालकांच्या  विरोधात तब्बल २२ कर्मचार्‍यांनी कामगार आयुक्तांच्या  न्यायालयात तक्रार केली होती; मात्र पेट्रोल पंप संचालकांनी  तक्रार करणार्‍या कर्मचार्‍यांना दबावात घेतल्याने अनेकांनी  माघार  घेतली. दरम्यान, कामगार आयुक्तांनी दिलेल्या  तारखांवर हजर न राहता पेट्रोल पंप चालकाने ठेंगा दाखविला  आहे. त्यामुळे आता न्याय मागण्यासाठी या कर्मचार्‍यांना  न्यायालयाशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.शहरातील एका नामी पेट्रोल पंपावर कार्यरत असलेल्या  कर्मचार्‍यांनी सहायक कामगार आयुक्तांकडे तक्रार केली होती.  अनेक वर्षांपासून कार्यरत असतानाही भविष्य निर्वाह निधी कपा त केला जात नाही. कामगारांसाठी असलेल्या कोणत्याही  सेवा-सुविधा दिल्या जात नाही. या तक्रारीची गंभीर दखल घेत  कामगार आयुक्त कार्यालयाने विवादात सापडलेल्या या पेट्रोल  पंप संचालकास नोटीस पाठवून याप्रकरणी स्पष्टीकरण सादर  करण्यास सांगितले. दरम्यान, सुरुवातीला येऊन पेट्रोल पंप  संचालकाने बाजू ठेवली. तक्रार करणार्‍यांपैकी सात जण  शेवटच्या तारखेपर्यंत टिकले. यातील पाच जणांनी संशयास्पद माघार घेतली. पाच जणांना  तक्रार मागे घेण्यासाठी पेट्रोल पंप संचालकांनी रक्कम दिल्याचे  काहींचे म्हणणे आहे. दरम्यान, कामगार आयुक्तांकडील तक्रारीतील हवा निघून  गेल्याने पेट्रोल पंप संचालकांनी तारखेवरही येणे सोडले आहे.  आता पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांनी न्यायालयात धाव घेण्याचा  निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप