शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : वाशिम बायपासवरून पेट्रोल-डिझेलचा टँकर लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 12:10 IST

Petrol-diesel tanker stolen from Washim bypass : १२ हजार लिटर डिझेल-पेट्रोलने भरलेला टँकर चोरी गेल्याची घटना २६ जूनच्या रात्री उघडकीस आली.

अकोला : जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाशिम बायपास जवळील एका अपार्टमेंटसमोरुन १२ हजार लिटर डिझेल-पेट्रोलने भरलेला टँकर चोरी गेल्याची घटना २६ जूनच्या रात्री उघडकीस आली. हा प्रकार एका दुसऱ्या टँकर चालकाच्या जागृकतेमुळे उघड झाला असून पोलिसांनी टँकरचा शोध सुरू केला आहे.

 

गायगाव येथून नांदेडसाठी टँकर क्रमांक एम.एच.३० - एबी - २९९९ यामध्ये ६ हजार लिटर डिझेल आणि ६ हजार लिटर पेट्रोल भरून निघाला होता. मात्र टँकर नादुरुस्त झाल्याने तो वाशिम बायपासवर दुरुस्तीसाठी उभा करण्यात आला, रात्री उशिरापर्यंत टँकर दुरूस्तीचे काम न झाल्याने, टॅंकरचा चालक सैय्यद फारूक सैय्यद मुजफ्फर रा.हमजा प्लॉट जुने शहर त्याच्या घरी निघून गेला. याच ठिकाणी महेश मनोहरलाल चावला यांचा यवतमाळसाठी पेट्रोल-डिझेल घेऊन जाणार आणखी एक दुसरा टॅंकर उभा होता. यवतमाळसाठी जाणारा टॅंकर २६ जून रोजी सकाळी पिंजरमार्गे यवतमाळसाठी निघाल्यानंतर या टँकरचा चालक मोहम्मद हारून याला रात्री दुरुस्तीसाठी उभा असलेला टॅंकर क्रमांक एम. एच.३०-ए. बी.२९९९ पिंजर जवळ रोडच्या कडेला उभा असल्याचे दिसले. यावरून नांदेडसाठी निघालेला टॅंकर यादिशेने कसा आला, याची माहिती मोहम्मद हारून याने टॅंकर मालक महेश चावला यांना दिली. त्यावरून चावला यांनी नमूद टँकरबाबत चालक सैय्यद फारूक याला विचारले असता, त्याने टॅंकर बायपास येथे उभा केला होता असे सांगितले. एकूणच प्रकारावरून टॅंकर चोरी झाल्याचे चावला यांच्या लक्षात आल्यावर या प्रकरणाची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून कलम ३७९ नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी गाठले घटनास्थळ

घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र देशमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. तपासाच्या दृष्टीने घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र काहीही हाती न आल्याने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी