शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

वाशिम बायपासवरून पेट्रोल-डिझेलचा टँकर लंपास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:14 IST

दुसऱ्या टँकर चालकाच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड अकोला : वाशिम बायपासजवळील एका अपार्टमेंटसमोरून १२ हजार लिटर डिझेल-पेट्रोलने भरलेला टँकर चोरी ...

दुसऱ्या टँकर चालकाच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

अकोला : वाशिम बायपासजवळील एका अपार्टमेंटसमोरून १२ हजार लिटर डिझेल-पेट्रोलने भरलेला टँकर चोरी गेल्याची घटना २६ जूनच्या रात्री उघडकीस आली. हा प्रकार एका दुसऱ्या टँकरचालकाच्या जागरूकतेमुळे उघड झाला असून, पोलिसांनी टँकरचा शोध सुरू केला आहे.

गायगाव येथून नांदेडसाठी टँकर (एम.एच.३०-एबी-२९९९) यामध्ये ६ हजार लिटर डिझेल आणि ६ हजार लिटर पेट्रोल भरून निघाला होता. मात्र टँकर नादुरुस्त झाल्याने तो वाशिम बायपासवर दुरुस्तीसाठी उभा करण्यात आला, रात्री उशिरापर्यंत टँकर दुरुस्तीचे काम न झाल्याने, टॅंकरचा चालक सय्यद फारूक सय्यद मुजफ्फर (रा.हमजा प्लॉट, जुने शहर) त्याच्या घरी निघून गेला. याच ठिकाणी महेश मनोहरलाल चावला यांचा यवतमाळसाठी पेट्रोल-डिझेल घेऊन जाणार आणखी एक दुसरा टॅंकर उभा होता. यवतमाळसाठी जाणारा टॅंकर २६ जून रोजी सकाळी पिंजरमार्गे यवतमाळसाठी निघाल्यानंतर या टँकरचा चालक मोहम्मद हारून याला रात्री दुरुस्तीसाठी उभा असलेला टॅंकर (एम. एच.३०-ए. बी.२९९९) पिंजरजवळरोडच्या कडेला उभा असल्याचे दिसले. यावरून नांदेडसाठी निघालेला टॅंकर या दिशेने कसा आला, याची माहिती मोहम्मद हारून याने टॅंकरमालक महेश चावला यांना दिली. त्यावरून चावला यांनी नमूद टँकरबाबत चालक सय्यद फारूक याला विचारले असता, त्याने टॅंकर बायपास येथे उभा केला होता, असे सांगितले. एकूणच प्रकारावरून टॅंकरचोरी झाल्याचे चावला यांच्या लक्षात आल्यावर या प्रकरणाची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून कलम ३७९ नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी गाठले घटनास्थळ

घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र देशमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. तपासाच्या दृष्टीने घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र काहीही हाती न आल्याने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

वाशीम बायपास परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज या चोरीचा छडा लावण्यासाठी ताब्यात घेण्यात आले. चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी वेगवेगळे पथक गठित करण्यात आले आहे. या चोरीच्या प्रकरणात १२ लाख रुपयांचा पेट्रोल-डिझेल चोरीला गेले आहे.