शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
5
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
6
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
7
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
8
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
9
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
10
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
12
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
13
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
14
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
15
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
16
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
17
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
18
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
19
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
20
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

शेंगा पोखरणा-या किडींचा तुरीवर हल्ला!

By admin | Updated: November 17, 2014 01:30 IST

अनेक ठिकाणी तूर फुलो-यावरच.

अकोला : तूर राज्यातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे; परंतु या पिकाच्या उत्पादनात घट येणार्‍या कारणापैकी तुरीवर होणारा किडीचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. डाळवर्गीय पिकावर पेरणीपासून पीक निघेपर्यंत जवळपास दोनशे प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आढळून आला असून, सद्यस्थितीत फुलोर्‍यावर असलेल्या तूर या पिकावर शेंगा पोखरणार्‍या अळ्य़ांनी हल्ला केला आहे. शेंगा पोखरणार्‍या अळ्य़ापासून तूर पिकाचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून, या किडीमुळे पिकांचे सर्वसाधारण ३0 ते ७0 टक्कय़ापर्यंत नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांना या पिकाची काळजी घ्यावी लागणार आहे. या किडीला हिरवी अमेरिकन बोंडअळी, घाटेअळी या नावाने ओळखले जाते. ही कीड बहुभक्षीय असून, तूर, हरभरा, वटाणा, मूग, उडीद, मसूर, सोयाबीन, चवळी इत्यादी कडधान्यावर फार मोठय़ाप्रमाणात आढळून येते. याशिवाय कपाशी, ज्वारी, टमाटे, तंबाखू, गांजा, सूर्यफूल, करडई य पिकावरदेखील ही कीड आढळून येते. या किडीचे पतंग शरीराने दणकट असून, पिवळसर रंगाचा असतो, पंखाची लांबी सुमारे ३७ मि.मी.एवढी असते. त्यांच्या पुढील तपकिरी पंखजोडीवर काळे ठिपके असतात तर मागील पंखाच्या कडा धुरकट रंगाच्या असतात. या किडीची मादी कोवळी पाने, देठ अथवा कळ्य़ा, फुले, तसेच शेंगावर वेगवेगळी अंडी घालतात, एक मादी सरासरी ६00 ते ८00 अंडी घालते, मादी नरापेक्षा मोठी असून, तिच्या शरीराच्या मागील भागावर केसांचा झुपका असतो. तुरीवर शेंगा पोखरणार्‍या किडीचा प्रादुर्भाव वाढला असून, या किडीमुळे मोठे नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांनी या किडीचे कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार एकात्मिक व्यवस्थापन करण्याची गरज आहे. मोठय़ा प्रमाणात कीड आल्यास कीटकनाशकांची फवारणी करण्याची शिफारस कृषी विद्यापीठाने शेतकर्‍यांना केली आहे.