शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१० हजार रुपयांपर्यंत दारू बाळगण्याची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:22 IST

एका व्यक्तीस तब्बल ३१ हजार २०० मिलीलीटर बिअर आणि वाइन तर १२ हजार लीटर स्पिरीट बाळगण्यास मुभा दिल्याने हा निर्णय दारू माफियांच्या पथ्यावर पडणारा आहे.

- सचिन राऊत  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: देशी व विदेशी दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असतानाच शासनाने दारू माफियांसाठी खुशखबर ठरणारा तर तळीरामांसाठी आनंद देणारा निर्णय घेतला आहे. एकीकडे वाइन बारवर सीसी कॅमेरे लावण्यासह विविध निर्बंध लादण्यात येत आहेत, तर दुसरीकडे एका व्यक्तीस तब्बल ३१ हजार २०० मिलीलीटर बिअर आणि वाइन तर १२ हजार मिलीलीटर स्पिरीट बाळगण्यास मुभा दिल्याने हा निर्णय दारू माफियांच्या पथ्यावर पडणारा आहे.एका दारू माफियाकडे १०० ते २०० कामगार असून, सदर दारू माफिया आता दारूची अवैधरीत्या वाहतूक करून शासनाच्या निर्णयाचा पुरेपूर फायदा घेणार असल्याचे वास्तव आहे.उत्पादन शुल्क विभागाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार एकावेळी एक व्यक्ती देशी दारूचे दोन युनिट म्हणजेच २ हजार मिलीलीटर तर बिअर व वाइनचे १२ युनिट म्हणजेच ३१ हजार २०० मिलीलीटर दारू बाळगण्यास मर्यादा देण्यात आली आहे. तर स्पिरीट (आयएमएफएल व आयात केलेले मद्य), ताडी आणि अल्कोहोल असलेले द्रव्य १२ युनिट म्हणजेच १२ हजार मिलीलीटरपर्यंत दर आठवड्याला बाळगण्यास मुभा देण्यात आली आहे.उत्पादन शुल्क विभागाने देशी व विदेशी, वाइन आणि बिअर बाळगण्यासाठी जी मर्यादा ठेवलेली आहे, ती दारू माफियांच्या पथ्यावर पडणारी आहे. पोलीस, उत्पादन शुल्क विभागाने देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक, विक्री करणाऱ्यांवर केलेल्या आतापर्यंतच्या कारवायांध्ये ३, ५ ते ९ हजार रुपयांपर्यंत दारू जप्त केली आहे; मात्र आता एका आठवड्यात एक व्यक्तीला तब्बल १० हजार रुपयांपर्यंतची दारू बाळगण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे बिअर बार, वाइन शॉप यांच्यापेक्षा दारू माफियांसाठी हा निर्णय चांगलाच फायद्याचा राहणार असल्याचे वास्तव आहे.देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांकडे ५ ते १० हजार रुपयांच्या मर्यादेतच दारू वाहतुकीसाठी असल्याचे आतापर्यंत झालेल्या कारवाईच्या आकडेवारीरून तसेच मुद्देमाल जप्तीवरून समोर आले आहे. त्यामुळे यापुढे दारूची अवैध वाहतूक किंवा विक्री करणाºया एखाद्यास पोलिसांनी किंवा उत्पादन शुल्क विभागाने पकडले आणि त्याच्याकडे त्या आठवड्यातील मर्यादेपेक्षा कमी दारू असेल तर पोलिसांना कारवाईसाठी अडचणीचे होणार आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोणत्या व्यक्तीला कोणत्या आठवड्यात पकडण्यात आले, याचे रेकॉर्ड ठेवणेही मोठे जिकिरीचे राहणार आहे. त्यामुळे दारू बाळगण्यासाठी दिलेली भरमसाट मुभा ही दारू माफियांच्या पथ्यावर पडणारी असल्याचे वास्तव आहे.

एक युनिटचे मिलीलीटर...देशी मद्याचे एक युनिट म्हणजेच १ हजार मिलीलीटर, स्पिरीट १ हजार मिलीलीटर, अल्कोहोल असलेले द्रव्य १ हजार मिलीलीटर, ताडी १ हजार मिलीलीटर तर बिअरचे एक युनिट म्हणजेच तब्बल २ हजार ६०० मिलीलीटर आणि वाइनचे १ युनिट म्हणजेच २ हजार ६०० मिलीलीटर ठरविण्यात आले आहे.

मद्याचा प्रकार                        युनिटदेशी दारू                                  ०२स्पिरीट                                    १२बिअर                                       १२वाइन                                       १२ताडी                                          १२अल्कोहोल द्रव्य                        १२

टॅग्स :AkolaअकोलाExcise Departmentउत्पादन शुल्क विभागliquor banदारूबंदी