शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीटभट्टीसाठी लागणार परवानगी; प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला नियमात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 13:11 IST

अकोला : विटांच्या ठरलेल्या आकारानुसार एकाचवेळी २५ आणि ५० हजार नगांची निर्मिती करणाऱ्या वीटभट्टीधारकांना तीन दिवसांनंतर पुन्हा वीटभट्टी लावण्यासाठी सक्षम अधिकाºयांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : विटांच्या ठरलेल्या आकारानुसार एकाचवेळी २५ आणि ५० हजार नगांची निर्मिती करणाऱ्या वीटभट्टीधारकांना तीन दिवसांनंतर पुन्हा वीटभट्टी लावण्यासाठी सक्षम अधिकाºयांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ नुसार राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकांचे पालन करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने विभागीय कार्यालयांना दिले आहेत.राष्ट्रीय, राज्य महामार्ग, गावे, वस्त्यालगत सुरू असलेल्या वीटभट्ट्यांमुळे प्रदूषणात होत असलेली वाढ रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्याला सातत्याने बगल दिली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील पारंपरिक वीटभट्ट्यांसाठी (स्थान, निश्चिती व उद्योग उभारणी) नियम २०१६ प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार या वीटभट्ट्या कोणत्या ठिकाणी असू नयेत, याबाबत विविध ठिकाणे, रस्ते, गावांपासूनचे अंतरही निश्चित केले आहे. या नियमांचा भंग करणाºया वीटभट्ट्यांवर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहेत; मात्र कारवाईस टाळाटाळ करण्यात आली. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणत्या मुद्यांवर कारवाई करावी, याबाबत पर्यावरण विभागाच्या सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या बैठकीत नियम २०१६ मध्ये सुधारणा करण्यात आली. त्या सुधारित नियमानुसार कारवाई करण्याचे पत्र २ नोव्हेंबर २०१८ रोजीच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयांना देण्यात आले.

हवेचे प्रदूषण रोखण्याचा उपायहवेची गुणवत्ता खराब होत असल्याने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यातून सजीवांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम झाला आहे. तो रोखण्यासाठी राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकांचे पालन बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार वीटभट्टी लावण्याचा नियमही ठरवून देण्यात आला.

वीटभट्टीच्या धुरामुळे पर्यावरणाचा घातवीटभट्टीमध्ये ९:४:६ इंच आकाराचे २५ हजार तसेच ९:४:३ इंच आकाराचे ५० हजार नगांची एकाचवेळी निर्मिती केल्यानंतर तीन दिवसांत पुन्हा वीटभट्टी लावायची असल्यास सक्षम अधिकाºयांनी परवानगी दिल्यानंतरच लावता येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकांचे पालन होत असल्याची खात्री अधिकाºयांना करावी लागणार आहे. निर्मितीच्या आकड्यासाठी पुन्हा तपासणीजिल्ह्यातील अनेक वीटभट्ट्यांवर नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांच्या काळात आठवडाभरात एका भट्टीवर लाखापेक्षाही अधिक विटा तयार केल्या जातात; मात्र त्यातून किती विटांची निर्मिती केली जात आहे, यासाठी पुन्हा तपासणीची तयारी होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाpollutionप्रदूषण