शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात मतदानाचा टक्का घसरला

By admin | Updated: October 17, 2014 01:25 IST

लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या मतदानात २.२८ टक्क्यांची घट.

संतोष येलकर/ अकोलाअकोला : लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी घेण्यात आलेल्या मतदानात जिल्हय़ातील सरासरी मतदानात २.२८ टक्क्यांची घट झाली असल्याने, सहा महिन्यातच जिल्हय़ातील मतदानाचा टक्का वाढण्याऐवजी घसरला आहे.पाच वर्षांपूर्वी सन २00९ च्या विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्हय़ातील आकोट, बाळापूर, अकोला पश्‍चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघात एकूण १२ लाख ७६ हजार ९१ मतदार होते. त्यापैकी ५४.११ टक्के मतदान त्यावेळी झाले होते. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिल २0१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत जिल्हय़ात सरासरी ५८.४६ टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यातच विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात होती. प्रत्यक्षात मात्र विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ात सरासरी ५६.१८ टक्के मतदान झाले. त्यामुळे सन २00९ च्या विधानसभा निवडणुकीतील मतदनाच्या तुलनेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातील सरासरी मतदानाची टक्केवारी २.0७ टक्के वाढली असली तरी, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या म तदानाच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातील सरासरी मतदानाच्या टक्केवारीत २.२८ टक्के घट झाल्याचे चित्र आहे.संभ्रम व अनुत्साह टक्का घसरण्याचे कारण!विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी दुभंगली. त्यामुळे या निवडणुकीत युती आणि आघाडीचे उमेदवार परस्परांविरोधात निवडणूक रिंगणात उतरले. त्यामुळे एकत्र असलेल्या मतदारांमध्ये विभाजन होऊन, मत कोणाला द्यावे, अशा संभ्रमात मतदार सापडला. निवडणूक रिंगणातील दोन्ही उमेदवारांसोब त चांगले संबंध असलेल्या कार्यकर्ते, मतदारांची घालमेल झाली. परिणामी संभ्रमात सा पडलेल्या मतदारांनी मतदान करण्याचे टाळले.जिल्हय़ात मतदारसंघनिहाय असे झाले मतदान!मतदारसंघ           एकूण मतदार                झालेले मतदान            टक्केवारीआकोट                    २७१९१८                     १६५0८४                      ६0.७१बाळापूर                  २८00८५                      १६७९५0                      ५९.९६अकोला पश्‍चिम       २७६४३२                      १४२५६८                      ५१.५७अकोला पूर्व               ३00६५१                    १६७७0६                      ५५.७८मूर्तिजापूर               २९३९४३                      १५६0८५                      ५३.१0............................................... एकूण                        १४२३0२९                 ७९९३९३                       ५६.१८