शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

धार्मिक स्थळांच्या मुद्यावर लोकप्रतिनिधी एकवटले

By admin | Updated: March 10, 2016 02:23 IST

भाजपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; शिवसेनेची लक्षवेधी.

अकोला: शहरात धार्मिक स्थळे हटवण्याच्या मुद्दय़ावर भाजप-शिवसेनेचे लोकप्रतिनिधी एकवटले असून, बुधवारी आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले, तर शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली आहे. याशिवाय कोणत्याही परिस्थितीत 'ओपन स्पेस'वरील धार्मिक स्थळे न हटविण्यासंदर्भात आ.बाजोरिया यांनी मनपा आयुक्त अजय लहाने यांच्यासोबत चर्चा केली.२९ सप्टेंबर २00९ नंतर उभारलेली धार्मिक स्थळे हटवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत मनपा प्रशासनाने कारवाई सुरू केली. मनपाच्या कारवाईत वाहतुकीला अडथळा न ठरणार्‍या तसेच प्रभागातील 'ओपन स्पेस'वर उभारलेली धार्मिक स्थळे हटवण्यात येत आहेत. रस्त्यालगत तसेच विकासकामांच्या आड येणारी धार्मिक स्थळे हटवण्याबाबत नागरिकांचा आक्षेप नसला तरी प्रभागातील 'ओपन स्पेस'वर उभारलेली धार्मिक स्थळे न हटवण्याची नागरिकांची आग्रही मागणी आहे. अकोलेकरांच्या लोकभावना लक्षात घेता, आ. शर्मा, आ. सावरकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सादर केले. मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, नगर विकास विभागाच्या सचिवांना मनपा प्रशासनासोबत चर्चा करून तातडीने निर्देश व सूचना जारी करण्याचे आदेश दिले.