शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूची जाहिरात झाल्यास थेट कंपनीवर दंडात्मक कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:09 IST

पान ठेल्यावर सिगारेट किंवा तंबाखुची जाहिरात करणारे फलक आढळल्यास थेट संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात पान ठेल्यावर तंबाखु किंवा तंबाखुजन्य पदार्थांची जाहिरात करणारे फलक आढळल्यास थेट संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई होणार आहे. जिल्हा तंबाखु नियंत्रण समितीची सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेला कारवाईचे आदेश दिले.राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम मागील काही दिवसांपासून राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शहरासह ग्रामीण भागातील शाळांमध्ये तंबाखुमुक्ती जनजागृतीची फलके लावण्यात येत आहेत; परंतु एवढे करून तंबाखुवर नियंत्रण मिळवणे शक्य नाही. त्यामुळे हा कार्यक्रम अधिक प्रभावी राबविण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय तंबाखु नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरासह ग्रामीण भागातील पान ठेल्यावर सिगारेट किंवा तंबाखुची जाहिरात करणारे फलक आढळल्यास थेट संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शहरासह जिल्हाभरातील पानठेल्यावर सूचना फलक लावण्यासोबतच १८ वर्षाखालील मुलांना तंबाखुजन्य पदार्थ विकणे कायद्याने गुन्हा आहे, असे फलक लावण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रीती कोगदे, धम्मसेन शिरसाट, जे.बी. अवघड यांनी पॉवर पॉइंटच्या माध्यमातून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे सादरीकरण केले, तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.डी. राठोड यांनी पीसीपीएनडीटी कार्यक्रमाविषयी उपस्थित सदस्यांना माहिती दिली. सभेला जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, मानसशास्त्रज्ञ डॉ. दुष्यंत देशपांडे, डॉ. योगेश शाहू, प्रा. मोहन खडसे, प्रा. संकेत काळे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एल.जी. राठोड, डॉ. एम.डी. राठोड, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारूख शेख, पी.एस.आय. सी.एम. वाघ, गीता अवचार आदी सदस्यांची उपस्थिती होती.आता तालुका व गावस्तरावर समितीशहरी भागासह ग्रामीण भागातही तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी तालुका आणि गावपातळीवर स्वतंत्र तंबाखु नियंत्रण समिती गठीत करण्यात येणार आहे. ही समिती बीडीओ यांच्या नियंत्रणाखाली काम करणार आहे.

ग्रामपंचायत स्तरावर जनजागृतीतंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत जनजागृती करणे शक्य नाही. त्यामुळे ग्राम पंचायत स्तरावर ही जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीमार्फत परिसरातील शाळांमध्ये तंबाखुमुक्ती जनजागृतीसंदर्भात फलक लावण्यात येणार आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीAkolaअकोला