शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

वजन मापात तफावत दर्शविणाऱ्या 'वे ब्रीज' संचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 12:55 IST

अकोला : स्थानिक एमआयडीसीत हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन ‘वे ब्रिज’च्या वजन मोजणीत तफावत असल्याची तक्रार अकोला डिस्ट्रीक्ट ट्रक ओनर्स वेलफेअर असोसिएशनने नोंदविल्यानंतर अकोला वैद्यमापनशास्त्र विभागाने अग्रवाल वे ब्रीजच्या संचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.

अकोला : स्थानिक एमआयडीसीत हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन ‘वे ब्रिज’च्या वजन मोजणीत तफावत असल्याची तक्रार अकोला डिस्ट्रीक्ट ट्रक ओनर्स वेलफेअर असोसिएशनने नोंदविल्यानंतर अकोला वैद्यमापनशास्त्र विभागाने अग्रवाल वे ब्रीजच्या संचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. सोबतच आठ दिवसांच्या आत वजनमापे पासिंग करून घेण्याची नोटीस बजावली. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरात खळबळ माजली आहे.२७ नोव्हेंबर १८ रोजी एपी २१ व्ही ३९२९ हे वाहन वाशिमहून हरभरा भरून नीलेश अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अकोला येथे आले. वजन करण्यासाठी उद्योजकाने एका वे ब्रिजवर पाठविले. वाहनाच्या मालासह वजन २९७३० किलो मोजण्यात आले. वजन कमी असल्याचे दिसून आल्यावर हे वाहन लगेच समोर असलेल्या दुसºया वे ब्रिजवर पाठविण्यात आले. येथे वाहन मालासह वजन २९७८५ भरले. दोन्ही वजनात तफावत आढळल्याने पुन्हा दोन ठिकाणच्या वजनात बदल दिसून आले. एमआयडीसीतील दोन्ही वे-ब्रीजसंदर्भात अकोला डिस्ट्रीक ट्रक ओनर्स वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी सुभाष भट्टल आणि अब्दुल वसीम यांनी, सुधीर कॉलनीतील सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र कार्यालयाकडे तक्रार केली. त्याची गंभीर दखल या विभागाने घेतली असून, एमआयडीसीतील दोन वे ब्रीजची तपासणी वैद्यमापनशास्त्र विभागाने केली. यामध्ये तफावत आढळल्याने अग्रवाल वे ब्रिजवर कारवाई करण्यात आली. 

 

तक्रारीत नमूद दोन्ही वे ब्रीजच्या वजन मापात २० किलोची तफावत आढळली. सोबतच दर्शनी भागात अग्रवाल यांनी प्रमाणपत्र ठेवलेले नव्हते. त्यामुळे ३ ए अन्वये नोटीस आणि नियम २२ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत वजनमापे अधिकृत पासिंगची मुदत अग्रवाल यांना देण्यात आली आहे.-ज्ञानदेव सिमरे, निरीक्षक, वैद्यमापन शास्त्र, अकोला.

-वे-ब्रीजचे मालक वजनमापात घोळ करीत नाही. ट्रकचालक आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी हे प्रयोग करून बदमाशी करतात. २० ते ४० किलो वजनाची तफावत ही ग्राह्य असते. वजनात काही बदल आढळत असतील तर लगेच तक्रार केली पाहिजे.-कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, इंडस्ट्रीज असोसिएशन, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ