शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘पीसीपीएनडीटी’ : अंमलबजावणीबाबत उदासीनता ‘लिंग निदान’च्या पथ्यावर!

By atul.jaiswal | Updated: July 24, 2019 12:13 IST

अकोला: गर्भधारणापूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत समुचित प्राधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे लिंगनिदान व अवैध गर्भपाताच्या गोरखधंद्याचा अजूनही पूर्णपणे बीमोड झाला नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय अधीक्षकाप्रमाणेच तहसीलदार, मुख्याधिकारी यांनाही समुचित प्राधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. आरोग्य अधिकारी वगळता तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांनी गत पाच वर्षात एकही कारवाई केली नसल्याचे वास्तव आहे.पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गर्भधारणापूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत समुचित प्राधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे लिंगनिदान व अवैध गर्भपाताच्या गोरखधंद्याचा अजूनही पूर्णपणे बीमोड झाला नसल्याचे वास्तव आहे. अकोल्यातील ऋषी होम नर्सिंग केअर रुग्णालयात सुरू असलेल्या लिंगनिदान व गर्भपात केंद्राच्या रविवारी रात्री झालेल्या पर्दाफाशानंतर ही बाब ठळकपणे अधोरेखित झाली आहे.पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाने वैद्यकीय अधीक्षकाप्रमाणेच तहसीलदार, मुख्याधिकारी यांनाही समुचित प्राधिकारी म्हणून नियुक्त केले आहे; मात्र राज्यात एकाही ठिकाणी आरोग्य अधिकारी वगळता तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांनी गत पाच वर्षात एकही कारवाई केली नसल्याचे वास्तव आहे.मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी राज्य शासनामार्फत विविध प्रयत्न केले जात आहे. त्याचदृष्टीने पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.यामध्ये आरोग्य विभाग, महसूल विभाग, महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन यांचा समावेश आहे. यादृष्टीने व्यापक जनजागृती, सोनोग्राफी, गर्भपात केंद्राची काटेकोर तपासणी, कारवाई याचा समावेश आहे. सोनोग्राफी केंद्र, गर्भपात केंद्र, प्रसूती गृहे यावर थेट जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचे नियंत्रण असले तरी यंत्रणेवर प्रशासकीय अंकुश असावा यादृष्टीने जिल्हाधिकाºयांसह तहसीलदार, मुख्याधिकाºयांनाही विशेष अधिकार दिले आहेत. आरोग्य अधिकाºयांप्रमाणेच तहसीलदार, मुख्याधिकारीसुद्धा सोनोग्राफी केंद्रे, गर्भपात केंद्रे तपासू शकतात; मात्र गत वर्षभरात अमरावती विभागात एकाही तहसीलदार किंवा मुख्याधिकाºयांनी एकाही ठिकाणी तपासणी केल्याचे ऐकिवात नाही.राज्याचे सेवानिवृत्त मुख्य सचिव जयंतकुमार भाटिया यांनी मुलींचा लिंगदर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून घेतली होती. अकोल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी परिमल सिंह यांनी जिल्ह्यातच नव्हे तर बुलडाणा, वाशिम, वर्धा जिल्ह्यात ‘डीकॉय’ (बनावट केस) च्या माध्यमातून अवैध गर्भपात केंद्रे व सोनोग्राफी केंद्र संचालकांविरुद्ध कारवाया केल्या होत्या. अलीकडच्या काळात मात्र प्रशासकीय अधिकाºयांकडून पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्यक्षरीत्या प्रयत्न होताना दिसत नसल्याचे वास्तव आहे.पोलीस अधीक्षक पथकाची दक्षताजिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला बेकायदेशीर सुरू असलेल्या तसेच बोगस डॉक्टरने चालविलेल्या हॉस्पिटलची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे रविवारी रात्री ऋषी होम नर्सिंग केअर रुग्णालयावर कारवाई करण्यात येऊन बोगस डॉक्टरसह तिघांना ताब्यात घेण्यात आले. गर्भलिंग निदान तंत्र अवैधरीत्या राजरोस सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या पथकाला मिळाली; मात्र हीच माहिती आरोग्य विभागाला का मिळाली नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAbortionगर्भपात