शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील दूध उत्पादकांची देयके रखडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 17:02 IST

तातडीने देयके न मिळाल्यास दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अकोला : जिल्ह्यातील दूध उत्पादकांची देयके रखडल्याने दूध उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांना तातडीने देयके न मिळाल्यास दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अंतर्गत प्राथमिक सहकारी दूध संस्था कार्यरत असून, या संस्था दूध महासंघाला दररोज त्याचा पुरवठा करीत आहे. आता तर चिखली येथूनसुद्धा दुधाचा पुरवठा महासंघाला करण्यात येत आहे. वाशिम येथूनही दुधाचा पुरवठा सुरू आहे. दररोज ५ ते ६ हजार लीटर दूध संघामार्फत शासकीय दूध योजना पाठवण्यात येते; परंतु मागील ५४ दिवसांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे दुधाचे पैसे मिळाले नाहीत. दूध महासंघ शेतकऱ्यांची संस्था असल्याने मागील महिन्यात महासंघाने स्वत:च्या बँक खात्यातील शेतकºयांना १९ लाख रुपयांची रक्कम दिली. हे पैसेदेखील शासनाकडून संघाला मिळाले नाही. त्यामुळे दूध महासंघही आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकºयांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासनाच्या हक्काचा पैसा द्यावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकºयांकडून केली जात आहे. १९ लाख दिले!५४ दिवसांपासून शासनाने दूध उत्पादक शेतकºयांचे पैसे न दिल्याने अकोला जिल्हा सहकारी दूध उत्पादक महासंघाने त्यांच्या खात्यातील १९ लाख रुपये दूध उत्पादक शेतकºयांना दिले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक महासंघही अडचणीत सापडला आहे. शासनाने दूध उत्पादकांचे तसेच महासंघाचे पैसे तातडीने न दिल्यास महासंघ शेतकरी यांच्यावर मोठी आर्थिक अडचण निर्माण होणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाmilkदूध