शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

वीज बिलाचा भरणा करून केला पाणी पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:48 IST

वॉर्ड क्र. ३,४, ५ या तीन वॉर्डांमधील  नागरिकांना मागील दीड महिन्यापासून पाणी पुरवठा केला जात  नव्हता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २४ ऑक्टोबरच्या अंकात  ठळकपणे प्रकाशित केल्यानंतर महान ग्रामपंचायतला जाग येऊन  वीज बिलाचा भरणा केला. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत  झाल्याने तीन वॉर्डांतील नागरिकांना आता पाणी मिळणार आहे.

ठळक मुद्देमहानच्या ग्रामपंचायतला आली जाग तीन वॉर्डांतील  नागरिकांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कमहान : महान ग्रामपंचायतने वीज बिल न भरल्यामुळे महावि तरण कंपनीने पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा दीड महिन्यां पूर्वी खंडित केला होता. त्यामुळे गावातील दोन वॉर्डांतील  नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करून त्यांना पाणी पुरवठा केला  जात होता; परंतु वॉर्ड क्र. ३,४, ५ या तीन वॉर्डांमधील  नागरिकांना मागील दीड महिन्यापासून पाणी पुरवठा केला जात  नव्हता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २४ ऑक्टोबरच्या अंकात  ठळकपणे प्रकाशित केल्यानंतर महान ग्रामपंचायतला जाग येऊन  वीज बिलाचा भरणा केला. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत  झाल्याने तीन वॉर्डांतील नागरिकांना आता पाणी मिळणार आहे. महावितरणचे पाणी पुरवठा योजनेसाठी वीज पुरवठय़ाचे सहा  लाख ५३ हजार २४0 रुपयांचे बिल ग्रामपंचायतकडे थकीत  असल्याने दीड महिन्यांपूर्वी नळ योजनेचा वीज प्रवाह खंडित  करण्यात आला होता. त्यानंतर महानमधील पाच वॉर्डांपैकी वॉर्ड  क्रमांक १ व २ मधील २१ महेल, बिहाडमाथा, चिंचखेड झोपड पट्टीमधील नागरिकांना महाजल योजनेच्या विहिरीमधून पाणी  पुरवठा होत होता; मात्र वॉर्ड क्रमांक ३, ४ व ५ मधील  नागरिकांना पिण्यास पाणी दिले जात नव्हते. तिन्ही वॉर्डांतील  जनता पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून वणवण  भटकत होती. दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना याबाबत  विचारले असता नळ योजनेच्या खात्यामध्ये पैसे नाहीत, पाणी  करवसुली झाल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही, असे  उत्तर दिले जात होते. आज पाणी येईल, उद्या येईल या आशेने  वाट पाहणार्‍या लोकांची सहनशीलता संपल्यानंतर शेवटी २२  ऑक्टोबर रोजी रात्री संतप्त नागरिकांनी महाजल योजनेच्या  विहिरीवरील मुख्य जलवाहिनी व एअर व्हॉल्व्हची तोडफोड  केली होती. याबाबतचे वृत्त २४ ऑक्टोबर रोजी ‘लोकमत’च्या  अंकात ठळकपणे प्रकाशित होताच महान ग्रामपंचायतकडून  मंगळवारी ५0 हजार रुपयांचा धनादेश वीज वितरण कंपनी  बाश्रीटाकळी यांना देण्यात आला. वीज बिलाचा भरणा  केल्यामुळे महावितरणने नळ योजनेचा वीज प्रवाह पुन्हा  जोडला. गावकर्‍यांनी दाखविलेल्या एकीच्या बळाचा विजय  झाल्याची चर्चा लोकांमध्ये होत आहे. 

नळ योजनेच्या खात्यात पैसे नसल्याने वीज बिलाचा भरणा कर ता आला नव्हता; परंतु  महानवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी  होणारा त्रास पाहता ५0 हजार रुपये उसनवारीने घेऊन वीज  बिलाचा भरणा केला आहे. महावितरणाच्या संबंधितांना वीज  जोडणी करण्याबाबत विनवणी केल्याने २४ ऑक्टोबर रोजी  नळ योजनेचा वीज प्रवाह जोडण्यात आला. त्यामुळे काही वंचि त भागात पाण्याचा पुरवठा करण्यात आला. महान  नळजोडणीधारकांनी थकित पाणी कराचा भरणा येत्या  आठ  दिवसात करून ग्रा. पं. प्रशासनाला हातभार सहकार्य करावे.- यास्मिन मो. इरफान, सरपंच, महान.

टॅग्स :Waterपाणी