शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांचे वेतन द्या; अन्यथा बेमुदत काम बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 14:19 IST

थकीत वेतन द्या, अन्यथा बेमुदत काम बंदचा इशारा मंगळवारी कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर गत चार महिन्यांपासून विनावेतन रुग्णसेवा देत आहेत. वेतन नाही, तर कुटुंबाचा गाडा चालवणे शक्य नाही. त्यामुळे आमचे थकीत वेतन द्या, अन्यथा बेमुदत काम बंदचा इशारा मंगळवारी कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी दिला.सर्वोपचार रुग्णालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे आॅक्टोबर २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंतचे वेतन थकीत आहे. गत चार महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने डॉक्टरांच्या कुटुंबाचा बजेट कोलमडला आहे. थकीत वेतनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडे वारंवार मागणी केली, तरी प्रशासनाकडून सकारात्मक उत्तर मिळत नसल्याने मंगळवारी ४० कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. थकीत वेतनाच्या मागणीसाठी सकाळीच निवासी डॉक्टरांनी अधिष्ठातांचे दालन गाठले. यावेळी अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत वेतन बँक खात्यात जमा होणार, असे आश्वासन दिल्याने डॉक्टरांनी संप मागे घेतला. दिलेल्या मुदतीत वेतन न मिळाल्यास बेमुदत काम बंदचा इशारा यावेळी डॉक्टरांनी दिला.

निधीअभावी रखडले वेतननिवासी डॉक्टरांच्या वेतनासाठी निधी कमी पडत असल्याने आॅक्टोबर महिन्यात शासनाकडे ८.५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. हिवाळी अधिवेशनात निधीला मंजुरीही मिळाली होती; परंतु महाविद्यालयाला अद्यापही निधी मिळाला नव्हता. हा निधी दोन दिवसांपूर्वीच आल्याची माहिती जीएमसी प्रशासनाने दिली.प्रहारच्या मध्यस्थीने आंदोलन मागेनिवासी डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत असताना प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांची भेट घेतली. थकीत वेतनासंदर्भात अधिष्ठातांसोबत चर्चेनंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अधिष्ठातांकडून लेखी आश्वासन घेत निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचे आवाहन केले.

वेतनासाठी कालच निधी आला. त्यामुळे वेतनाची देयके काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात निवासी डॉक्टरांना कळविले होते; मात्र ते संपावर गेले. त्यामुळे त्यांचे एका दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेशही दिला आहे.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोला