पातूर : स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान महायज्ञात पातूरकरांनी सहभागी होऊन ‘लोकमत’शी रक्ताचे नाते जोडले. शुक्रवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४३ जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांमध्ये अधिकारी, युवक आणि डॉक्टरांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक हरीश गवळी, प्रमुख अतिथी म्हणून बीएएमएस कॉलेजचे प्रशासक साजीद शेख, शहाबाबू एज्युकेशन सोसायटीचे प्रा. इसाक राही, डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालयाचे डॉ. किरण खंडारे, किड्स पॅराडाईजचे गोपाळ गाडगे, विस्तार अधिकारी उल्हास मोकळकर, प्रेरणा शेतकरी समूहाचे दीपक इंगळे, सुवर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे अध्यक्ष सचिन कोकाटे, शिर्ला ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे, बीएएमएस कॉलेजच्या डॉ. सुनीता कदम, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा निकम आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मृणाल इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन सचिन कोकाटे, संतोषकुमार गवई यांनी केले. या रक्तदान शिबिरात गुरुदेव सेवा मंडळ, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, ईगल ग्रुप, भंडारज बु. येथील युवक मंडळ आणि पातूरकरांनी सहभाग नोंदविला. बहुजन विद्यार्थी परिषद, इगल ग्रुप यांच्यावतीने सुजित इंगळे यांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा केला. प्रामुख्याने आकाश हिवराळे, सागर इंगळे यांच्या नेतृत्वात वाढदिवसानिमित्त रक्तदान उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. प्रशांत निकम, डॉ खंडारे, दुले खान युसुफ खान, साजिद हुसेन, राहुल सोनोने, गजानन येनकर, बाबुराव सावंत, रामहरी पल्हाड, अमोल सोनोने, प्रशांत गवई आदींनी परिश्रम घेतले. (फोटो)
अधिकाऱ्यांनी केले रक्तदान
निवडणूक नायब तहसीलदार विजय खेडकर, नायब तहसीलदार सय्यद येहसानोद्दीन, ग्राम विकास अधिकारी राहुल उंद्रे आणि डॉक्टर नितीन शेंडे यांनी शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले. रक्तदान शिबिराला डॉ. राहुल खंडारे, न.प. मुख्याधिकारी सोनाली यादव, किड्स पॅराडाईजच्या संचालिका जोत्स्ना गाडगे, साने गुरुजी बहुउद्देशीय संस्थेचे विशाल राखोंडे, सागर राखोंडे, राष्ट्रधर्म युवा मंचचे संदीप गिर्हे, तालुका विकास मंचचे शिवकुमार बायस आदींनी शिबिराला भेटी दिल्या.
090721\img-20210709-wa0435.jpg
लोकमत रक्ताचं नातं