शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

रुग्णांची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:39 IST

अकोला : जिल्हय़ातील गरीब रुग्णांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही. आरोग्याच्या योजनेंतर्गत असणार्‍या सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ रुग्णांना प्राधान्याने द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकार्‍यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांना केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांचे निर्देश आरोग्य विभागाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील गरीब रुग्णांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही. आरोग्याच्या योजनेंतर्गत असणार्‍या सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ रुग्णांना प्राधान्याने द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकार्‍यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांना केली.नियोजन भवनात बुधवारी आरोग्यविषयक सर्व समित्यांच्या आयोजित एकत्रित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्यविषयक समितीचे सभापती जमीर उल्ला खॉ पठाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौहान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदींसह तालुका आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली धडक मोहिमेंतर्गत रुग्णालये तपासणी जिल्हास्तरीय समिती, जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती, नियमित लसीकरण सक्षमीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय जंतनाशक मोहीम कार्यक्रम, अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रम, जिल्हास्तरीय लोकसंख्या धोरण समन्वय समिती, जिल्हा गुणवत्ता आश्‍वासन कार्यक्रम, कुष्ठरोग शोध अभियान, राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत असणारे कार्यक्रम, आशा कार्यक्रम, सिकल सेल कार्यक्रम, रुग्ण कल्याण समिती आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. लसीकरण मोहीम ग्रामीण व शहरी भागात प्रभावीपणे राबवावी. अतिसार प्रभावित क्षेत्रात आरोग्य सुविधा दक्षतेने पुरवाव्यात. संभावित पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अतिसाराचा प्रसार होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी. माता व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जननी सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना वेळेत लाभ द्यावा. आशा सेविकांची रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. सिकलसेलच्या रुग्णांची दक्षतेने तपासणी करा, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी या बैठकीत दिले.

त्रुटींची पूर्तता न करणार्‍या रुग्णालयांवर कारवाईप्रारंभी रुग्णालय तपासणी धडक मोहिमेंतर्गत त्रुटी आढळलेल्या जिल्हय़ातील १00 रुग्णालयांना जारी केलेल्या नोटिसा व त्याला अनुसरून केलेल्या त्रुटींची पूर्तता यावर चर्चा झाली. पीसीपीएनडीटीच्या कायदेविषयक सल्लागार अँड. शुभांगी खांडे यांनी त्रुटी आढळलेल्या रुग्णालयांनी नोटिसीला अनुसरून काय कारवाई केली, याबाबत माहिती दिली.जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी  १५  मार्च २0१७ ते १९ मे २0१७  या कालावधीत त्यांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालये / दवाखान्यांची तपासणी केली होती. तपासणीत त्रुटी आढळलेल्या रुग्णालयांना नोटिस पाठविण्यात आल्या होत्या. यापैकी नोटिसा पाठविलेल्या अकोट येथील १८ पैकी १८ रुग्णालयांनी खुलासा दिला. बाळापूर येथील ४0 पैकी २६ रुग्णालय, मूर्तिजापूर येथील ८ पैकी ७  रुग्णालय आणि अकोला ग्रामीण (सर्व तालुके) मधील ३४ पैकी १९ रुग्णालयांनी खुलासा दिला. ज्या रुग्णालयांनी त्रुटीची योग्यरीत्या पूर्तता केलेली नाही, अशा रुग्णालयांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले.